सणासुदीच्या निमित्ताने विवोने दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने आपला लोकप्रिय स्मार्टफोन बिग जॉय दिवाळी ऑफर अंतर्गत सवलतीत उपलब्ध करून दिला आहे. कंपनीच्या Vivo X80 Series, Vivo V25 Series, Y75 Series, Y35 Series वर चांगली सूट मिळू शकते. बिग जॉय दिवाळी ऑफर सुरू झाली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत त्याचा लाभ घेता येईल. विवो सेलमध्ये अनेक ऑफर, कॅशबॅक आणि वॉरंटी देखील देत आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सेलमध्ये विवो हा स्मार्टफोन फक्त १०१ रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहे. याशिवाय, Flipkart दिवाळी आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये आणखी बरेच विवो स्मार्टफोन्स सवलतींसह घेतले जाऊ शकतात. बिग जॉय दिवाळी सेलबद्दल सर्व काही सांगूया…
( हे ही वाचा: Amazon वर मिळतेय OnePlus, Redmi, Samsung च्या 5G स्मार्टफोनवर बंपर ऑफर; संधीचा फायदा घ्या)
Vivo Big Joy Diwali Sale
विवो आपल्या बिग जॉय दिवाळी सेलमध्ये अनेक ऑफर देत आहे. कंपनीने X, V आणि Y सीरीज फोनवर ऑफर जाहीर केल्या आहेत. ऑफर कालावधी दरम्यान, ग्राहक Vivo X80 आणि Vivo X80 Pro ICICI किंवा SBI EMI पर्यायासह ८००० रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी करू शकतात. याशिवाय, कंपनी X सीरीजचे फोन त्याच्या एकरकमी पैशांसह घेण्यावर सहा महिन्यांची विस्तारित वॉरंटी देखील देत आहे.
त्याचप्रमाणे, Vivo ICICI किंवा SBI EMI पर्यायासह V25 मालिकेवर ४००० रुपयांपर्यंतची कॅशबॅक देत आहे. कंपनी Vivo V25 सीरीज फोनवर सहा महिन्यांची विस्तारित वॉरंटी देत आहे. Vivo Y सीरीजबद्दल ग्राहकांना ICICI किंवा SBI EMI द्वारे फोन खरेदी केल्यावर २००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. कंपनी Vivo ग्राहकांना कंपनी Y सीरीज डिव्हाइसेसवर Jio Digital Life चे १०००० रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. वापरकर्त्यांना Vivo Y75 आणि Y35 स्मार्टफोन्सवर अतिरिक्त सहा महिन्यांची वॉरंटी देखील मिळेल.
( हे ही वाचा: आता iPhone 13 Mini खरेदी करा फक्त अर्ध्या किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची ‘दिवाळी धमाका ऑफर’)
Vivo Rs 101 स्मार्टफोन ऑफर
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Vivo ने १०१ रुपयांची स्मार्टफोन ऑफरही जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक फक्त १०१ रुपये देऊन V, X आणि Y सीरीजचे फोन घरी घेऊ शकतात. मात्र, कंपनीने याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. तुम्हाला याविषयी अधिक माहिती जवळच्या रिटेल स्टोअरमध्ये मिळेल. Vivo १०१ रुपये आणि EMI च्या डाउन पेमेंटसह स्मार्टफोन ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.