SmartPhones Under 60000: सध्या भारतात काही वर्षांपासून स्मार्टफोनचे मार्केट खूप वाढले आहे. अनेक कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्सचे मॉडेल्स लाँच करत असतात. आजकाल स्मार्टफोन काळाची गरज बनली आहे. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त ६०,००० रुपयांच्या आतमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

गेल्या काही महिन्यांमध्ये oneplusमी iQoo आणि तरं ब्रँडचे फोन लॉन्च झाले आहेत. त्यामध्ये अनेक नवीन फीचर्स, चांगला कॅमेरा देण्यात आले आहेत. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर हे स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. आज आपण मे महिन्यामध्ये ६० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येतील असे कोणकोणते स्मार्टफोन्स आहेत ते जाणून घेणार आहोत.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा : Amazon Great Summer Sale: iPhone 14 अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी, वाचा काय आहे ऑफर

 Vivo X90 5G

Vivo X90 आणि vivo x90 pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. हे दोन्ही फोन्स mediatek dimension ९२०० या चिपसेटसह काम करतील. या दोन्ही फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास vivo x90 मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० MP चा सोनीचा IMX866 मेन सेन्सर आणि १२ MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि १२ MP चा टेलिफोटो लेन्स मिळणार आहे.

OnePlus 11 5G

या स्मार्टफोनमध्ये १२० hZ च्या रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा 2K सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले येतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 हा प्रोसेसर येतो. OnePlus ने Hasselblad सोबतच्या भागीदारीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. तसेच यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप येतो. यामध्ये ५० मेगापिक्सलचा IMX890 प्रायमरी सेन्सर आहे. ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि ३२ मेगापिक्सलचा सोनी IMX709 सेन्सर टेलिफोटो कॅमेरा सेटअप येतो. तसेच वापरकर्त्यांना १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये न्यू जनरेशन अँड्रॉइड १३ वर आधारित असून यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी येते. तसेच १०० वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट येतो. हा फोन ४० मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज होतो. OnePlus 5G या स्मार्टफोनमध्ये बेस मॉडेल हे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्न स्टोरेजचे येते. या व्हेरिएंटची किंमत ही ५६,९९९ रुपये आहे. 

हेही वाचा : पेटीएम पाठोपाठ Phone Pe ने लॉन्च केले UPI Lite फीचर; पासवर्डशिवाय करता येणार ‘इतक्या’ रुपयांचे पेमेंट

 iQOO 11 5G

iQoo ११ ५जी या स्मार्टफोनमध्ये १४४०x३२०० पिक्सल रिझोल्युशन आणि ६.७८ इंचाचा सॅमसंग E6 AMOLED स्क्रीन येतो. याची रॅम ३ जीबी आहे. तसेच यामध्ये ५१२ जीबी पर्यत यूएफएस ४.० इतके स्टोरेज वापरकर्त्यांना मिळते. यामध्ये कॅमेरा हा ५० एमपी सॅमसंग जीएन ५ या सेन्सरसह १३ मेगापिक्सल पोर्टेट सेन्सर आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सरयुक्त येतो. iQoo 11 5 जी या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ५,००० mAh इतकी आहे. तसेच यातील प्रो मॉडेलला २०० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ४,७०० mAh इतकी क्षमता असलेली बॅटरी येते.