स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo लवकरच स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo X Note चे स्पेसिफिकेशन्स लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाले आहेत. या स्मार्टफोनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा मोठा ७ इंचाचा कर्व्ड डिस्प्ले मिळू शकतो. तसंच, मागील बाजूस 50MP सह आणखी 48MP कॅमेरा असू शकतो. याशिवाय 80W फास्ट चार्जिंग सपोर्टही दिला जाईल.
कंपनीने अद्याप या फोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण Vivo चा हा फोन चीनमधील अधिकृत स्टोअरमध्ये दिसला आहे. WHYLAB ने हा स्मार्टफोन स्पॉट केला आहे. टिपस्टरने फोनचे डिटेल्स शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी, टिपस्टरने 3C प्रमाणपत्रावर आणखी एक Vivo फोन पाहिला. हा फोन सर्टिफिकेशन साइटवर Vivo V2196A या मॉडेल क्रमांकासह पोस्ट करण्यात आला होता. कदाचित ही दोन्ही डिव्हाईस समान असतील.
Vivo X Note चे संभाव्य स्पेसिफिकेशन
टिपस्टरनुसार, Vivo X Note मध्ये ७ इंचाचा Samsung E5 AMOLED QHD+ दिला जाईल. त्याचबरोबर फोनमध्ये Qualcomm चा फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 8 Gen 1 सादर केला जाईल. यात 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. हे 12GB पर्यंत रॅम, 512GB पर्यंत स्टोरेजसह येईल.
आणखी वाचा : Google ने आणले एक नवीन अपडेट, Android युजर्स १५ मिनिटांत हिस्ट्री डिलीट करता येणार
कॅमेरा आणि बॅटरी
Vivo X Note च्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग S5KGN1 सेन्सर त्यात उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 48MP रियर कॅमेरा, 18MP अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2MP मायक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा Vivo फ्लॅगशिप फोन 80W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह येऊ शकतो.
Vivo X80 Pro चे स्पेसिफिकेशन लीक
मॉडेल नंबर V2196A सह आणखी एक फोन Vivo ने पोस्ट केला आहे. हा फोन Vivo X80 Pro असू शकतो. या फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 6.78-इंच 120Hz E5 AMOLED डिस्प्ले देखील आहे. फोनचा डिस्प्ले FHD+ (फुल एचडी प्लस रिझोल्यूशन) देईल. यात 4,700mAh बॅटरीसह 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.