विवो एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कम्पनी नवनवीन स्मार्टफोन्स बाजारात लॉन्च करत असते. आज विवोने आपली बहुप्रतीक्षित अशी V29 सिरीज भारतात लॉन्च केली आहे. यामध्ये V29 आणि V29 Pro या स्मार्टफोनचा समावेश आहे. जागतिक स्तरावर ही सिरीज ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. या सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती, कॅमेरा , बॅटरी आणि फीचर्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

फीचर्स

विवो V29 हा फोन हिमालयीन ब्ल्यू, मॅजेस्टिक रेड आई स्पेस ब्लॅक या तीन रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर V29 Pro हा फोन हिमालयीन ब्ल्यू आणि स्पेस ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. विवोच्या या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये स्लिक डिझाइन देण्यात आले आहे. या फोनमध्ये कर्व्ह स्क्रीन मिळणार आहे. यामुळे फोनला प्रीमियम लूक प्राप्त होतो. रिअर कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास तीन कॅमेरा लेन्स, एक एलईडी फ्लॅश आणि स्मार्ट Aura लाइट असणारा एक कॅमेरा मिळणार आहे. दोन्ही फोनमध्ये टाइप-सी चार्जिंगची सुविधा मिळते. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?

हेही वाचा : केवळ २०,८९९ रूपयांमध्ये iPhone 14 खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय डिस्काउंट, एकदा पाहाच

विवोच्या दोन्ही फोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेट असलेला ७.७८ इंचाचा कर्व्ह AMOLED असा HDR 10+ डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळणार आहे. V29 मध्ये लकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा तर V29 Pro मध्ये मिडियाटेक डायमेनसिटी ८२०० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. V29 मध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल शूटर आणि २ मेगापिक्सलचा बोकेह लेन्स मिळते. तर V29 Pro मध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२ मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स मिळते. दोन्ही फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही फोनमध्ये ४६०० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच फोन चार्जिंगला लावला असता १८ मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के चार्ज होऊ शकतो असा विवोचा दावा आहे.

हेही वाचा : ICC Cricket World Cup 2023: आता मॅचेस बघताना मिळणार नवीन अनुभव; Disney+ Hotstar ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट फिचर

किंमत आणि उपलब्धता

V29 हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आणि २५६ जबीई स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ३६,९९९ रुपये इतकी आहे. तर दुसरीकडे V29 देखील८/२५६ जीबी स्टोरेज आणि १२/२५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. ८ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत ३९,९९९ रुपये तर १२ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत ४२,९९९ रुपये आहे.

दोन्ही फोन्सची प्री-ऑर्डर आजपासूनच सुरू होणार आहे. विवो V29 ची विक्री १० ऑक्टोबरपासून सुरु होईल तर विवो V29 १७ ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. खरेदीदार हा फोन विवोची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर खरेदी करू शकतात. हे फोन्स विवो स्टोअर्ससह क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स आणि बजाज इलेक्ट्रॉनिक्ससारख्या अन्य रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे.

Story img Loader