Vivo ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. ज्यात वापरकर्त्यांना चांगले फीचर्स, चांगला कॅमेरा,फीचर्स आणि स्टोरेज मिळेल. विवो लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी असणाऱ्या विवोने Vसिरीज बद्दल ट्वीट करत माहिती दिली. या स्मार्टफोनमध्ये विवो आपल्या ग्राहकांना कोणकोणते फीचर्स देणार आहे तसे च याची किंमत काय असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा फोन कधी लॉन्च होणार आहे याबद्दल जाणून घेऊयात.
विवोने लवकरच लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनचे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर रेंडर्स पोस्ट केले आहेत. ज्यामुळे याच्या डिझाइनबद्दल खुलासा झाला आहे. विवो आपला V29e हा फोन लॉन्च करणार आहे. यामध्ये वक्र डिस्प्ले आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी मध्यवर्ती-संरेखित होल-पंच कटआउट दाखवण्यात आला आहे. हा फोन ३डी कर्व्ह स्क्रीन असलेला सर्वात स्लिम फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
विवो V29e मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात OIS सह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये रंग बदलणाऱ्या रिअर ग्लास पॅनलसह आर्टिस्टिक रेड आणि आर्टिस्टिक ब्लू कलर पर्यायांमध्ये फोन ऑफर केल्याची पुष्टी झाली आहे.
विवो V29e हा फोन ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आणि ८/२५६ जीबी स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FunTouchOS 13 वर चालतो. यामध्ये ४,६०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ८० W चा चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
किंमत व लॉन्च होण्याची तारीख
कंपनीने या फोनची लॉन्च होण्याची तारीख X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या टिझर पोस्टनुसार विवो V29e २८ ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनची विक्री Flipkart द्वारे केली जाणार आहे.या फोनची किंमत २५ ते ३० हजार रूपयांमध्ये असण्याची शक्यता आहे.