सध्याच्या काळामध्ये स्मार्टफोन प्रत्येकाची गरज बनला आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्टफोन उत्पादक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मोबाइल फोन बाजारपेठेमध्ये लॅान्च करत असतात. अशाच एका कंपनीपैकी असणारी vivo ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी उद्या दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. त्या स्मार्टफोनबद्दल म्हणजेच त्यांची किंमत, त्यांचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेणार आहोत.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo आज भारतात आणखी दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. अलीकडेच कंपनीने vivo t2 5G मालिका भारतात लॉन्च केली आहे. आता कंपनी X90 सीरीज लॉन्च करणार आहे जी आधीच कंपनीने चीनमध्ये लॉन्च केली आहे. या सिरीजअंतर्गत, कंपनीने चीनमध्ये तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro Plus यांचा समावेश आहे. भारतात फक्त दोन स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत ज्यामध्ये Vivo X90 आणि Vivo X90 Pro यांचा समावेश आहे .

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल

हेही वाचा : युजर्ससाठी WhatsApp लवकरच लॉन्च करणार ‘Channels’ नावाचे फिचर; मिळणार ‘हे’ फायदे

काय असणार दोन्ही फोन्सचे फीचर्स ?

Vivo X90 आणि vivo x90 pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. हे दोन्ही फोन्स mediatek dimension ९२०० या चिपसेटसह काम करतील. या दोन्ही फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास vivo x90 मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० MP चा सोनीचा IMX866 मेन सेन्सर आणि १२ MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि १२ MP चा टेलिफोटो लेन्स मिळणार आहे.

याशिवाय vivo x90 pro या फोनमध्ये तुम्हाला तीन कॅमेरे मिळणार आहेत. ज्यामध्ये ५० MP चा सोनीचा IMX989 प्रायमरी सेन्सर, ५० MP ची पोर्ट्रेट लेन्स आणि १२ MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही फोनमध्ये सेलफिसाठी ३२ MP कहा कॅमेरा तुम्हाला वापरायला मिळणार आहे.Vivo X90 या फोनमध्ये ४८१० mah ची बॅटरी आणि Vivo X90 Pro मध्ये ४८७० mAh ची बॅटरी मिळते. यामध्ये तुम्हाला १२० W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच टॉप एन्ड व्हेरिएंट हे ५०W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

हेही वाचा : Google Play Store Down: गुगल प्ले स्टोअर झाले डाऊन, युजर्सना Apps डाऊनलोड करण्यात येतेय अडचण

काय असणार किंमत ?

विवो कंपनी vivo x90 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरीईएंटमध्ये लॉन्च करू शकते. ज्यामध्ये ८ /१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही ५९,९९९ रुपये तर १२/२५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ६३,९९९ रुपये इतकी आहे. तसेच Vivo x90 pro हा फोन कंपनी १२/२५६ जीबी या प्रकारामध्ये लॉन्च करू शकते. ज्याची किंमत ८४,००० रुपये आहे. मात्र अजून फोनच्या किंमतीबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे.

Story img Loader