Vivo ही एक चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. याच Vivo कंपनीने आपला प्रीमियम स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये काय प्रमुख फिचर आहे. तसेच त्याची बॅटरी, परफॉर्मन्स आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Vivo कंपनीने आपला प्रीमियम स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला असून याचे प्रमुख फिचर हे आहे की हा स्मार्टफोन सरड्यासारखे रंग बदलतो. जेव्हा हा स्मार्टफोन तुम्ही तुमच्या घरातून किंवा खोलीमधून उन्हात नेता तेव्हा त्याचा रंग मागील बाजूने बदलतो.Vivo ने Vivo Y100 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

हेही वाचा : Cheapest Cooler: उन्हाळ्याच्या तोंडावर कूलर खरेदीत बंपर ऑफर, अवघ्या ५०० रुपयांत मिळतायेत ‘हे’ जबरदस्त पोर्टेबल कूलर

Vivo कंपनीचे स्ट्रॅटेजी हेड योगेंद्र श्रीरामुला यांनी सांगितले की, या स्मार्टफोनमध्ये कंपनीने रंग बदलणारी टेक्नॉलॉजी वापरली आहे. जे इतर ब्रँडपेक्षा वेगळे दर्शवते. याचा एक व्हिडीओ देखील कंपनीने शेअर केला आहे.

फिचर्स

Vivo ने Vivo Y100 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ६.८ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. जो डिस्प्ले 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी आणि ४४ वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते. यात ८ जीबी रॅम आहे.

किंमत

Vivo कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन तुम्ही Amazon, Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. जर तुम्ह इ ICICI, SBI, HDFC, किंवा Kotak mahindra बँकेच्या कार्डने पैसे देऊन स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला कंपनीकडून १५०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. हा फोन तुम्ही पॅसिफिक ब्ल्यू आणि ट्विनलाइट गोल्ड या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo launched its vivo y100 smartphone with color changing features tmb 01