Vivo एक लोकप्रिय स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आज विवो कंपनी Vivo T2 5G Series लॉन्च करणार आहे. या सिरीज अंतर्गत कंपनी Vivo T2 5G आणि Vivo T2 X 5G हे फोन लॉन्च करणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये लॉन्च केले जातील, ज्यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स मिळतील. या विवोच्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय काय आहे हे जाणून घेऊयात.

Vivo T2 5G चे फीचर्स

Vivo T2 5G या फोनमध्ये तुम्हाला पॉली कार्बोनेट बॅक असे डिझाईन मिळणार आहे. फोन ड्युअल शेडमध्ये येईल ज्याचा रंग सूर्यप्रकाशात प्रवेश करताच बदलेल. विवोच्या या फोनमध्ये तुम्हाला ६.४ इंचाचा OMLED डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९० hz इतका असणार आहे. तसेच सेफ्टी फीचर्समध्ये या फोनला इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी मोबाईलमध्ये ड्युअल फोन केटरर सेटअप उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा OIS कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा एक कॅमेरा असणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरकर्त्यांना १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ४५०० mAh ची बॅटरी आणि ४४ W चा चार्जिंग सपोर्ट मिळेल. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज तसेच ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

allu arjun pushpa 2 trailer release
Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

हेही वाचा : मुंबईतील Apple रिटेल स्टोअरजवळ ‘या’ २२ दिग्गज ब्रँड्सना आपली दुकाने उघडता येणार नाहीत, जाणून घ्या कारण

Vivo T2 X 5G  चे फीचर्स

Vivo T2 X 5G या स्मार्टफोनमध्ये IPS डिस्प्ले मिळेल ज्याला १२० hz चा रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये MediaTek Demensity 700 हा प्रोसेसर येतो. ड्युअल कॅमेरा सेटॅपमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ५००० mAh चा बॅटरी सपोर्ट मिळणार आहे. तसेच हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे. ज्यामध्ये ४/१२८ जीबी, ६/१२८ जीबी आणि ८/ १२८ जीबी असे पर्याय उपलब्ध असणार आहेत.

काय असणार किंमत ?

Vivo T2 5G सिरीजमध्ये दोन फोन्स लॉन्च होणार आहेत. ज्यामध्ये Vivo T2 5G ची किंमत २५,००० रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय Vivo T2 X 5G हा फोन१७ ते २०,००० हजार रुपयांच्या किंमतीमध्ये लॉन्च होऊ शकतो. फोनच्या स्टोरेज व्हेरिएंटनुसार फोनच्या किंमतीमध्ये बदल होत असतो हे लक्ष घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : एक चूक झाली आणि ‘गुगल पे’ने अनेक युजर्सच्या खात्यावर ८० हजार रुपये पाठवले, नेमकं काय घडलं? वाचा…

Vivo ची नवीन सिरीज आज लॉन्च होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला विवो इंडियाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर विनामूल्य पाहता येणार आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन ५जी नेटवर्कला सपोर्ट करतात.