सध्याच्या काळामध्ये स्मार्टफोन प्रत्येकाची गरज बनला आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्टफोन उत्पादक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मोबाइल फोन बाजारपेठेमध्ये लॅान्च करत असतात. अशाच एका कंपनीपैकी असणारी vivo या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्या आज आपण स्मार्टफोनबद्दल म्हणजेच त्यांची किंमत, त्यांचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेणार आहोत.
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आज भारतात आणखी दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. अलीकडेच कंपनीने vivo t2 5G मालिका भारतात लॉन्च केली आहे. आता कंपनी X90 सीरीज लॉन्च करणार आहे जी आधीच कंपनीने चीनमध्ये लॉन्च केली आहे. या सिरीजअंतर्गत, कंपनीने चीनमध्ये तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro Plus यांचा समावेश आहे. भारतात फक्त दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत ज्यामध्ये Vivo X90 आणि Vivo X90 Pro यांचा समावेश आहे .
काय असणार दोन्ही फोन्सचे फीचर्स ?
Vivo X90 आणि vivo x90 pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. हे दोन्ही फोन्स mediatek dimension ९२०० या चिपसेटसह काम करतील. या दोन्ही फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास vivo x90 मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० MP चा सोनीचा IMX866 मेन सेन्सर आणि १२ MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि १२ MP चा टेलिफोटो लेन्स मिळणार आहे.
याशिवाय vivo x90 pro या फोनमध्ये तुम्हाला तीन कॅमेरे मिळणार आहेत. ज्यामध्ये ५० MP चा सोनीचा IMX989 प्रायमरी सेन्सर, ५० MP ची पोर्ट्रेट लेन्स आणि १२ MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही फोनमध्ये सेलफिसाठी ३२ MP चा कॅमेरा तुम्हाला वापरायला मिळणार आहे.Vivo X90 या फोनमध्ये ४८१० mah ची बॅटरी आणि Vivo X90 Pro मध्ये ४८७० mAh ची बॅटरी मिळते. यामध्ये तुम्हाला १२० W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच टॉप एन्ड व्हेरिएंट हे ५०W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
काय असणार किंमत ?
विवो कंपनी vivo x90 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरीईएंटमध्ये लॉन्च करू शकते. ज्यामध्ये ८ /१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ही ५९,९९९ रुपये तर १२/२५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ६३,९९९ रुपये इतकी आहे. तसेच Vivo x90 pro हा फोन कंपनी १२/२५६ जीबी या प्रकारामध्ये लॉन्च करू शकते. ज्याची किंमत ८४,००० रुपये आहे.