Vivo पुढील आठवड्यात भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लॉंच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने Vivo T1X भारतात लॉंच केल्याची पुष्टी केली आहे. Vivo चा नवीन T-Series स्मार्टफोन २० जुलै रोजी लॉंच होणार आहे. T1X 4G स्मार्टफोन हा Vivo च्या T-सिरीजमधील चौथा स्मार्टफोन असेल. Vivo ने पुष्टी केली आहे की, नवीन Vivo T1x हँडसेट ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर भारतात उपलब्ध होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडिया टुडे टेकच्या एका रिपोर्टमध्ये Vivo च्या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. अहवालात टिपस्टर योगेश ब्रारचा हवाला देत दावा करण्यात आला आहे की, भारतात लाँच होणारा Vivo T1X 4G स्मार्टफोन मलेशियामध्ये लॉंच केलेल्या व्हेरिएंटपेक्षा वेगळा असेल. Vivo T1X च्या किंमती, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक माहितीबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो…

Vivo T1X India Specifications
Vivo चा नवीन 4G स्मार्टफोन T1X या नावाने भारतात लॉंच होणार आहे. कंपनीच्या T-Series लाइनअपमधील हा दुसरा 4G फोन आहे. आता अधिकृत लॉंचपूर्वी या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, फोनमध्ये ६.५८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन फुलएचडी + रिझोल्यूशनसह येईल. स्क्रीनचा रिफ्रेश दर ९० Hz असू शकतो.

आणखी वाचा : सर्वोत्तम टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी; ३२, ४२, ४३, ५० आणि ६५ इंच असलेल्या Android स्मार्ट टीव्हीवर ३३% पर्यंत सूट

Vivo T1X 4G फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर दिला जाईल. याच वर्षी लाँच झालेल्या Vivo T1 44W मध्ये देखील हाच प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Vivo फोन ४ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज सह येऊ शकतो. अहवालात दावा करण्यात आला आहे की Vivo T1X च्या भारतीय मॉडेलमध्ये ५००० mAh बॅटरी मिळेल. पण फोनसोबतच्या बॉक्समध्ये १८ W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर T1X 4G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. डिव्हाईसबद्दल रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की डिव्हाईसमध्ये अल्ट्रा-वाइड कॅमेरा नसेल आणि फोनमध्ये २ मेगापिक्सेलचा डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर असू शकतो. हँडसेटमध्ये Android 12 ऑपरेटिंग सिस्टम दिली जाऊ शकते. Android सर्वोत्तम Funtoch OS 12.1 कस्टम स्किन फोनमध्ये उपलब्ध असेल. Vivo चा हा बजेट स्मार्टफोन १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉंच होण्याची शक्यता आहे.