Vivo ने बुधवारी आपला नवा स्मार्टफोन Vivo T1x भारतात लॉंच केला. Vivo T1X स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट, ५००० mAh बॅटरी आणि ५० MP कॅमेरा आहे. हा Vivo फोन अल्ट्रा गेम मोड आणि मल्टी टर्बो ५.० फीचर्ससह येतो. Vivo T1X ची स्पर्धा रेडमीच्या लोकप्रिय Redmi Note 11 स्मार्टफोनशी आधीच सुरू झाली आहे.

जर तुम्ही 4G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल पण कोणता फोन घ्यायचा या गोंधळात असाल तर आम्ही तुमचा त्रास थोडा कमी करू. आम्ही तुम्हाला Vivo T1X आणि Redmi Note 11 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगत आहोत. आता तुम्हाला Vivo किंवा Redmi पैकी कोणता फोन घ्यायचा आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकाल. चला या दोन हँडसेटची तुलना करूया…

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
mage of a laptop or mobile phone with a red "X" symbol, or a Supreme Court building photo
Right To Privacy : नागरिकांच्या गोपनीयतेला ‘सर्वोच्च’ स्थान, आरोपींचा मोबाइल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
Apple smart doorbell camera uses Face ID to unlock your door
Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार

आणखी वाचा : Amazon Prime Day 2022 : अशा पद्धतीने मिळवा फ्री प्राइम सबस्क्रिप्शन आणि OTT कंटेटचा आनंद

Vivo T1x vs Redmi Note 11 Display, Chipset
Vivo T1X मध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले आहे जो फुलएचडी + रिझोल्यूशनसह येतो. तसंच Redmi Note 11 मध्ये ६.४३ इंच फुलएचडी + डिस्प्ले उपलब्ध आहे.
Vivo T1X आणि Redmi Note 11 हे दोन्ही स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह येतात.

Vivo T1x vs Redmi Note 11 Ram, Storage
कंपनीने Vivo T1X स्मार्टफोन ४ GB रॅम आणि ६ GB रॅम आणि ६४ GB आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेजमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
Redmi Note 1 स्मार्टफोन ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आणि ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजमध्ये खरेदी करता येईल.

Vivo T1x vs Redmi Note 11 Camera
Vivo T1X मध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये २ मेगापिक्सल्सचा सेकेंडरी सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, Vivo च्या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi Note 11 Pro बद्दल बोलायचं झालं तर हे डिव्हाइस क्वाड कॅमेरा सेटअप देते. हा फोन ५० मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल सेकेंडरी आणि २ मेगापिक्सेल सेन्सरसह येतो.

आणखी वाचा : Redmi Note 10 Pro वर १३ हजारांपर्यंत बचत करण्याची संधी, Flipkart वर मिळतेय उत्तम डील

Vivo T1x vs Redmi Note 11 Battery, OS
Vivo T1X ला पॉवर देण्यासाठी, १८ W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसंच रेडमी नोट 11 मध्ये ३३ W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी उपलब्ध आहे.
Vivo च्या फोनला Android 12 आधारित कस्टम स्किन मिळते तर Redmi च्या फोनला Android 11 आधारित कस्टम स्किन मिळते.

Vivo T1x vs Redmi Note 11 Price
Vivo T1X च्या ४ GB रॅम आणि ६४ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. तसंच ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तसंच टॉप-एंड व्हेरिएंट ६ GB आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज १४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा हँडसेट ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि स्पेस ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येईल.
तसंच Redmi Note 11 च्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आणि ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. हा फोन ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट कलर व्हेरिएंटमध्ये घेता येईल.

Story img Loader