Vivo ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने भारतात ऍप्लाइक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. विवोने भारतात आज T2 Pro स्मार्टफोन लॉन्च केला आहे. विवोने लॉन्च केलेला हा फोन नुकताच काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या iQOO Z7 Pro प्रमाणेच आहे. दोन्ही फोनचे फीचर्स आणि किंमत एकसारखीच आहे. विवो T2 Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्शन ७२०० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. या नवीन फोनची किंमत, त्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Vivo T2 Pro: फीचर्स

नवीन लॉन्च झालेल्या विवो फोनचे डिझाइन iQOO Z7 Pro प्रमाणेच आहे. यामध्ये तुम्हाला कर्व्ह डिस्प्ले आणि स्लिम डिझाइन मिळते. हा स्मार्टफोन वजनाने फार हलका देखील आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा AMOLED कर्व्ह डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे.वापरकर्त्यांना या फोनमध्ये हूड अंतर्गत मीडियाटेक डायमेन्शन ७२०० चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे. हे डिव्हाइस अँड्रॉइड OS सह येतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : iQOO ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…, ऑफर्स एकदा पाहाच

विवो T2 Pro मध्ये कंपनीने मागील बाजूस दोन कॅमेरे दिले आहेत. ज्यामध्ये OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये एक एलईडी फ्लॅशचा समावेश आहे. तसेच या कॅमेरा सेटअपमधील दुसरा सेन्सर हा २ मेगापिक्सलचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी वापरकर्त्यांना यामध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. या ५जी फोनमध्ये ४,६०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच याला ६६W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. विवो या ५जी फोनमध्ये एक फास्ट चार्जर देखील ऑफर करते.

Vivo T2 Pro: भारतातील ऑफर्स आणि किंमत

विवोने T2 Pro 5G हाफेन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. यातील १२८ जीबीस्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. तर २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. या फोनचा पहिला सेल हा २९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सेल फ्लिपकार्टवर सुरु होईल. कंपनीने यावर काही ऑफर्स देखील दिल्या आहेत. ज्यात Axix आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट ऑफर असेल. तसेच १ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo t2 pro launch india 24999 rs 4600 mah battery ois 64 mp camera check offers tmb 01