Vivo V50 Lite 4G Launched : विवो या कंपनीचे फोन हे नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. कारण- या कंपनीच्या फोनचा कॅमेरा जबरदस्त असतो. आता कंपनी पुन्हा ग्राहकांना प्रेमात पाडण्याच्या तयारीत आहे. विवो कंपनीने तुर्कीमध्ये विवो व्ही५० लाइट ४जी (Vivo V50 Lite 4G) हा फोन लाँच केला आहे. हा फोन भारतात गेल्या वर्षी आलेल्या व्ही४० लाइटचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. त्यामध्ये डिस्प्ले, बॅटरी, कॅमेरा टेक्नॉलॉजी या बाबी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. त्यात १२० हर्ट्झ एमोलेड स्क्रीन, ५० एमपी प्रायमरी सेन्सरसह ड्युअल-कॅमेरा सिस्टीम व ६,५०० एमएएच बॅटरी यांचा समावेश आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Vivo V50 Lite 4G मध्ये एफएचडी प्लस रिझोल्युशनसह ६.७७ इंचांचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 1800 nits पर्यंतची पीक ब्राइटनेस व 387 PPI ची पिक्सेल डेन्सिटीसुद्धा देतो. हा डिस्प्ले DCI P3 कलर गॅमटला (colour gamut)देखील सपोर्ट करतो आणि पाहण्याच्या आरामात वाढ करण्यासाठी SGS सर्टिफाईड आय कम्फर्ट आणि लो ब्ल्यू लाइट तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
७.७९ मिमी स्लिम प्रोफाइल, १९६ ग्रॅम वजनाच्या या स्मार्टफोनला MIL-STD-810H सर्टिफिकेशन मिळाले आहे, जे वाईट परिस्थितीत टिकाऊपणा सुनिश्चित करते. त्यात IP65 धूळ आणि पाण्यापासून मोबाईलचे संरक्षण करू शकते. तसेच Vivo V50 Lite क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 685 चिपसेटवर चालतो, ज्यामध्ये ऑक्टा-कोर CPU आणि Adreno 610 GPU आहे. हे डिव्हाइस 8GB LPDDR4X रॅमसह जोडलेले आहे आणि 256GB UFS 2.2 अंतर्गत स्टोरेज देते, ज्यामध्ये व्हर्च्युअल रॅम एक्स्पान्शनचा पर्याय आहे. V50 Lite हा Android 15 वर आधारित FunTouch OS 15 वर चालतो. त्यात AI फोटो स्टुडिओ, AI सुपरलिंक व सर्कल टू सर्च सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
कॅमेरा आणि बॅटरी लाईफ
फोटोग्राफीसाठी, V50 Lite मध्ये 50MP Sony IMX 882 में कॅमेरा आहे, जो 2MP मॅक्रो कॅमेरासह येतो. कॅमेरा सिस्टीममध्ये AURA लाईट आहे, ज्यामुळे फोटो खूप मस्त येतो. समोरचा म्हणजेच फ्रंट कॅमेरा 32MP हाय क्वालिटीचा आहे. या स्मार्टफोनमध्ये ६,५००mAh ब्ल्यूव्होल्ट बॅटरी आहे. Vivo चा दावा आहे की, ९०W फ्लॅशचार्जसह बॅटरी फक्त ५७.५ मिनिटांत ०% ते १००% पर्यंत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. हे ६W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगलादेखील सपोर्ट करते. या डिव्हाइसमध्ये ४०० टक्के व्हॉल्युम मोडसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत, जे ऑडिओला सपोर्ट करतात.
किंमत
Vivo V50 Lite 4G च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची TRY किंमत १८ हजार ९९९ रुपये (सुमारे ४५,००० रुपये) आहे. हा फोन टायटॅनियम ब्लॅक आणि टायटॅनियम गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर Vivo च्या फोन खरेदीसह मोफत Vivo Buds True आणि TRY 3,000 (सुमारे ७,१०० रुपये)पर्यंत एक्स्चेंज बोनससुद्धा तुम्हाला दिला जाऊ शकतो.