मोबाईल उत्पादक कंपनी विवो आपल्या नवीन मॉडेलवर काम करत होती. आता या नवीन मॉडेलचे काम पूर्ण झालेले असून विवो डिसेंबरमध्ये आपली ‘Vivo X90’ मालिका लाँच करणार आहे. या सिरिजमध्ये Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+या मॉडेल्सचा समावेश असू शकतो. हा विवो स्मार्टफोन Snapdragon 8Gen2 चिपसेट सह बाजारात उपलब्ध होऊ शकतो. ही मालिका चीनसोबत भारतात लाँच होणार असल्याची माहिती आहे. अलीकडेच, या तीन प्रीमियम फोनचे अनेक अहवाल लीक झाले होते, ज्यामध्ये प्रोसेसर आणि लॉन्चचा खुलासा झाला होता. आता एक नवीन लीक माहिती समोर आली असून यावरून मालिकेच्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे.
- कसा असेल फोनचा कॅमेरा ?
GSM Arena च्या अहवालात असे म्हटले आहे की, Vivo X90 मालिकेत १-इंचाचा Sony IMX९८९ कॅमेरा सेन्सर असेल, जो कॅमेरा पोर्ट्रेट आणि कमी प्रकाश मोडमध्ये उत्कृष्ट फोटो कॅप्चर करण्यास अनुमती देईल. याशिवाय, ६४MP OmniVision OV64B टेलिफोटो लेन्स देखील सीरीज फोनमध्ये आढळू शकतात. तलेच, Vivo X90 मालिका ५० MP Sony IMX758 सेन्सरने सुसज्ज असेल. यासोबतच यूजर्सना स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजनचा सपोर्टही मिळेल.
आणखी वाचा : भन्नाट ऑफर! Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन फक्त ३,९९९ मध्ये खरेदी करा…
- Vivo X90 फोनची वैशिष्ट्ये
Vivo X90 सिरीजमध्ये AMOLED डिस्प्ले असू शकतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये Snapdragon ८ Gen २ चिपसेट असू शकतो. त्यासोबतच MediaTek Dimension ची फ्लॅगशिप चिपसेट देखील यामध्ये असू शकते. पण अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.
- Vivo X90 बॅटरी
या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये १२०W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,०००mAh mAh बॅटरी पॅक असू शकते मात्र, कंपनीने स्मार्टफोन सीरिजच्या किंमतबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.