बहुप्रतीक्षित vivo x 90 फोनबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. फोनचे डिजाईन आणि कॅमेरा कसा असेल? याबाबत इंटरनेटवर अनेक लिक प्रसिद्ध झाले होते. आता कपनीने अधिकृतरित्या व्हिवो एक्स ९० स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती उघड केली आहे.
व्हिवो एक्स ९० फोनमध्ये १२० वॉटच्या फास्ट चार्जिंगसह दोन डिस्प्लेंचा पर्याय मिळणार असल्याचे समजले आहे. बीओई क्यू ९ आणि सॅमसंग ई ६ पॅनल असे हे दोन पर्याय आहेत. कंपनीनुसार, फोनला मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असेल. हा स्मार्टफोन डीईएनएए डेटाबेसवर प्रसिद्ध झाला असून तो डायमेन्सिटी ९२०० प्रोसेसरसह मिळण्याची शक्यता आहे. हा फोन २२ नोव्हेंबरला चीनमध्ये लाँच होणार आहे.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळू शकतो. आधी स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचची अमोलेड स्क्रिन मिळणार असल्याचे समोर आले होते. मीडियाटेक डायमेन्सिटी ९२०० चिपसेटसह मिळणारा हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित ओरिजिन ओएस ३ ऑपरेटिंग सिस्टिमसह उपलब्ध होऊ शकतो.
स्मार्टफोनमध्ये एलपीडीडीआर ५ रॅम आणि यूएफएस ४.० स्टोअरेज मिळू शकते. फोनला मागे ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, १२ एमपी पोट्रेट सेन्सर आणि १२ एमपी अल्ट्रा वाईड सेन्सर, १२० वॉट फास्ट चार्जिंगसह ४ हजार ८१० एमएएचची बॅटरी देखील मिळणार असल्याचे म्हटले जाते. ही स्मार्टफोन सिरीज व्हिवो व्ही ८० सिरीजची जागा घेणार आहे. या सिरीजमधील फोन्स सुधारीत वैशिष्ट्ये आणि अद्ययावत कॅमेऱ्यांसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लाँच पूर्वी या फोनचे फीचर्स ऑनलाइन प्रसिद्ध झाले आहेत.