काही काळापासून भारतामध्ये विवोची X सिरीज लाँच होणार असल्याची नुसती चर्चा होती. मात्र, आता ग्राहकांची प्रतीक्षा संपली असून, विवो X १०० आणि विवो X १०० प्रो हे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. अर्थातच यात अनेक उत्तम फीचर्स आहेत. तरीही त्यांच्या कॅमेऱ्याने ग्राहकांचे लक्ष विशेषत्वाने वेधून घेतले आहे. काय आहे या स्मार्टफोन्सच्या किमती आणि खासियत पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विवो X १०० आणि X १०० प्रोची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कॅमेरा

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून, विवो X १०० प्रो स्मार्टफोनमध्ये ५०MP मुख्य आणि विशेष पेरिस्कोप झूम कॅमेरा देण्यात आला आहे. या झूम कॅमेऱ्यामध्ये ५०MP सेन्सरसमोर १०० एमएम लेन्स आहे; जी सगळ्यांपेक्षा हटके असून, त्यास Zeiss APO प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. त्यासोबतच ५०MP अल्ट्रा वाइड लेन्स असून, त्यामध्ये विवोची नवी 6nm V3 इमेजिंग चिप वापरण्यात आली आहे.
विवो X १०० या स्मार्टफोनमध्ये, ५०MP वाइड अँगल लेन्स, ७०mm झूम लेन्ससोबत ६४MP सेन्सर देण्यात आला आहे. त्यासह विवो १०० X प्रो प्रमाणे यातही १५mm अल्ट्रा वाइड लेन्स लावलेली आहे. मात्र यामध्ये मागच्या वर्षीची V2 इमेजिंग चिप वापरण्यात आली आहे.
दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी ३२MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

हेही वाचा : Itel A70, भारतात लॉन्च होणाऱ्या २५६ जीबी स्मार्टफोनची किंमत पाहून व्हाल थक्क!! फोन विकत घेण्यासाठी लावाल भलीमोठी रांग, पाहा

बॅटरी

विवो १०० X : या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh बॅटरी बसवण्यात आली आहे; जी १२० W इतक्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
विवो १०० X प्रो : या स्मार्टफोनमध्ये ५४००mAh बॅटरी देण्यात आली आहे. मात्र, हा फोन X १०० प्रमाणे १२० W चार्जिंगला सपोर्ट न करता, केवळ १०० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा प्रो फोन असला तरीही X १०० बॅटरी आणि चार्जिंगमध्ये उजवा ठरला आहे.

स्टोरेज

विवो X100, विवो X100 प्रो हे दोन्ही फोन पॉवर्डबाय मीडिया डायमेनसिटी ९३०० चिपसेट [MediaTek Dimensity 9300 chipset] आहेत.
X100 : या स्मार्टफोनमध्ये १२GB रॅम व २५६GB स्टोरेज आणि १६GB रॅम आणि ५१२GB स्टोरेज असे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत.
X १०० प्रो : यामध्ये १६GB रॅम and ५१२GB असे एकच स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध असणार आहे.

स्क्रीन

दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच स्क्रीन आणि 8T LTPO AMOLED डिसप्ले दिलेला आहे; ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz आणि ब्राईटनेस ३००० नीट्स [nits] इतका आहे. दोन्ही फोनमध्ये स्क्रीनवर फिंगरप्रिंट रीडर देण्यात आला आहे.

किंमत

विवो X १०० हा दोन व्हेरियंटमध्ये आणि विवो १०० X प्रो हा एकाच म्हणजे सिंगल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असल्याने या तिन्ही फोन्सच्या किमती काय आहेत ते पाहा.

विवो X १०० १२GB रॅम + २५६GB स्टोरेज फोनची किंमत ६३,९९९ रुपये इतकी आहे.
विवो X १०० १६GB रॅम + ५१२GB स्टोरेज फोनची किंमत ६९,९९९ रुपये इतकी आहे.
विवो X १०० प्रो १६GB रॅम + ५१२GB स्टोरेज फोनची किंमत ८९,९९९ रुपये इतकी आहे.

हेही वाचा : वन प्लस १२ व वन प्लस १२ R नवीन स्मार्टफोन लॉंच होण्याआधीच फोनची किंमत जाहीर? जाणून घ्या….

हे सर्व फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. त्यांचे बुकिंग तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन म्हणजे विजय सेल्स, क्रोम, जियो डिजिटल स्टोअर्स यांसारख्या ठिकाणांहून करू शकता. या स्मार्टफोन्सची ऑनलाइन विक्री फ्लिपकार्ट या शॉपिंग साईटवरून केली जाणार आहे. तसेच विवोने यावर स्मार्टफोनवर विशेष ऑफर्सदेखील दिलेल्या आहेत. जर तुम्ही आयसीआयसीआय [ICICI] किंवा एसबीआय [SBI] बँकेचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरलेत, तर त्यावर तुम्हाला १० टक्के कॅशबॅक मिळवता येऊ शकते आणि तुम्ही जुना फोन एक्स्चेंज केलात, तर त्यावर तुम्हाला जवळपास आठ हजार रुपयांपर्यंत सूट मिळवता येऊ शकते.