वोडाफोन -आयडिया ही देशातील सर्वात मोठी तिसरी टेलिकॉम कंपनी आहे. व्हीआयला अजून आपले ५जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. लवकरच ते ५जी नेटवर्क सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच व्हीआयकडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन देखील लॉन्च करत असते. वोडाफोन-आयडियाच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. जे वापरकर्त्यांच्या मनोरंजनासाठी आहेत. मनोरंजनासाठी टेलिकॉम कंपनी अतिरिक्त डेटा बंडल करते आणि OTT कंटेंट प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन देखील ऑफर करते.
जर का तुम्ही अशा कोणत्या प्रीपेड प्लॅनच्या शोधत आहात जे डिस्नी+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतात. यासाठी तुम्ही व्हीआयचे काही प्लॅन खरेदी करू शकता. रिलायन्स जिओने डिस्नी + हॉटस्टार बंडल प्रीपेड प्लॅन सादर करणे बंद केले आहे. तसेच एअरटेलकडे असे अनेक मर्यादित प्लॅन आहेत. आज आपण व्हीआयचा प्रीपेड प्लॅन्स आहेत ज्यांत २८ दिवसांची वैधता मिळते. आणि त्यात विनामूल्य डिस्नी + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन ऑफर करते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
वोडाफोन-आयडियाकडे तीन प्रीपेड प्लॅन्स आहेत. ज्यात वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता आणि मोफत डिस्नी+हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅन्सची किंमत अनुक्रमे ३९९ रूपये, ४९९ रुपये आणि ६०१ रुपये इतकी आहे.
वोडाफोन-आयडियाची हे तीनही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि डिस्नी+ हॉटस्टार मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. तर ६०१ आणि ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ जीबी दररोजचा डेटा येतो. हे सर्व प्लॅन्स Vi Hero Unlimited फायद्यांसह येतात. व्हीआय हिरो अनलिमिटेड फायद्यांमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डीलाइट्स, बिंज ऑल नाइटचा समावेश होतो.
३९९ आणि ४९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह तुम्हाला ३ महिन्यासाठी डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तर ६०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी हा फायदा मिळतो. वोडाफोन-आयडीयाकडे व्हीआय मुव्हीज अँड टीव्ही नावाचे इन-हाऊस OTT प्लॅटफॉर्म देखील आहे. जे वर दिलेल्या प्लॅन्ससह वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.