भारतामध्ये सध्या Reliance Jio , Airtel आणि Vodafone -Idea अशा आघाडीच्या तीन टेलिकॉम कंपन्या आहेत. वोडाफोन-आयडिया ही तिसऱ्या क्रमांकाची आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. व्हीआय आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. त्यात इतर अनेक फायदे देखील कंपनी ग्राहकांना देते. तसेच कंपनी असे काही प्लॅन ऑफर करते जे Disney+ Hotstar सह येतात.

भारतीय वापरकर्त्यांमध्ये Disney+ Hotstar बंडल प्रीपेड प्लॅन लोकप्रिय आहेत. मात्र त्यांच्या मागणीला अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे या OTT प्लॅटफॉर्मने भारतीय बाजारपेठेतील HBO आणि IPL मधील लोकप्रिय शो चे अधिकार गमावले आहेत. आता आपण व्हीआयच्या २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील डिस्नी + हॉटस्टारच्या बंडल प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

हेही वाचा : I/O Connect Bangalore: भारतीय डेव्हलपर्ससाठी गूगलने केली AI टूल्ससह ‘या’ फीचरची घोषणा

वोडफोनचा १५१ रुपयांचा प्लॅन

वोडाफोन-आयडियाचा १५१ रुपयांचा प्लॅन डिस्नी + हॉटस्टार मोबाइलसह येणार सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन एक डेटा व्हाउचर आहे. ज्याचा अर्थ असा होतो की हा प्लॅन सुरू करण्यासाठी तुम्हाला बेस प्लॅनची आवश्यकता असणार आहे. १५१ रुपयांचा हा प्लॅन ३ महिन्यांसाठी डिस्नी + हॉटस्टार मोबाइलच्या अ‍ॅक्सेससह येतो. यामध्ये वापरकर्त्यांना ८ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता ३० दिवस इतकी आहे.

हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, या कंपनीद्वारे ऑफर केले जाणारे असे अनेक प्लॅन्स आहेत ज्याची निवड तुम्ही करू शकता. डिस्नी+ हॉटस्टार मोबाइल प्लॅन जे २८, ७० आणि ८४ व ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यातील कोणताही प्लॅन निवडू शकता. यामधील काही प्लॅन्स हे वापरकर्त्यांसाठी बोनस डेटा देखील बंडल करतात.

हेही वाचा : WhatsApp Feature: व्हॉट्सअ‍ॅपच्या करंट आणि लाईव्ह लोकेशनमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या

जर का तुम्हालाहे प्लॅन्स रिचार्ज करायचे असतील तर तुम्ही व्हीआयच्या वेबसाईट किंवा मोबाइल App वर जाऊन करू शकता. ते App iOs आणि अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. व्हीआयला अजूनही आपले ५ जी नेटवर्क लॉन्च करता आलेलं नाही. मात्र कंपनी लवकरच ५जी नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता आहे.