वोडाफोन-आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करतच असते. वोडाफोन आयडियाचा (Vi) प्रीपेड ग्राहक आधार तिमाही दर झपाट्याने कमी होताना दिसत आहे. तरीदेखील कंपनी आपल्या ग्राहकांसाठी काही आकर्षक प्लॅन्स ऑफर करत आहे. वोडाफोन आयडिया कंपनीला अजून देशामध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेलप्रमाणे ५ जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. मात्र ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. आज आपण व्हीआयच्या प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हीआयचा हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटाशिवाय अतिरिक्त डेटाची आवश्यकता भासते. जिओ एअरटेलप्रमाणे व्हीआय तुम्हाला ५ जी नेटवर्क ऑफर करत नाही. या सर्व प्लॅन्समध्ये तुम्हाला ४ जी डेटा वापरायला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे. व्हीआयच्या असणाऱ्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : ICC World Cup स्पर्धेसाठी एअरटेलने लॉन्च केले ‘हे’ दोन प्लॅन्स, फायदे एकदा बघाच

वोडाफोन-आयडियाचा २९९ रुपयांचा प्लॅन

वोडाफोन-आयडियाचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १. ५ जीबी डेटासह येतो. हा प्लॅन सध्या ग्राहकांना ५ जीबी बोनस डेटा देखील ऑफर करतो. या प्लॅनची विशेष बाब म्हणजे हा प्लॅन व्हीआय हिरो अनलिमिटेड फायद्यांसह येणारा एंट्री लेव्हल प्लॅन आहे. याचा अर्थ या प्लॅनमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर, बिंग ऑल नाइट आणि डेटा डिलाइट्सचे फायदे मिळतात.

या प्लॅनची वैधता केवळ २८ दिवसांची आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना यामध्ये ४२ जीबी डेटा + ५ जीबी बोनस डेटा असा ४७ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही क्लासिकचा ओटीटीचा फायदा देखील मिळेल. तुम्ही व्हीआय अ‍ॅपच्या माध्यमातून ओटीटी कंटेंट पाहू शकता जो iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच या प्लॅनसह वापरकर्ते आपल्या FUP डेटाला प्रभावित न करता प्रत्येक दिवशी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea 299 rs prepaid short term plan comes with 5 gb bonus deta and daily 1 5 gb deta tmb 01