वोडाफोन-आयडिया ही तिसऱ्या क्रमांकाची भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. व्हीआय कंपनीला अजून आपले ५जी नेटवर्क देशामध्ये सुरू करता आलेलं नाही. मात्र ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड, पोस्टपेड प्लॅन लॉन्च करत असते. तसेच व्हीआय आपल्या ग्राहकांना काही विस्तारित प्लॅन म्हणजेच पूर्ण वर्षाचे देखील प्लॅन ऑफर करत असते. ३६५ दिवस म्हणजे एका वर्षासाठी असणाऱ्या व्हीआयच्या प्लॅनपैकी चार प्रमुख प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत.
वोडाफोन-आयडियाचे ३६५ दिवसांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन
व्हीआयचा ३,०९९ रुपयांचा प्लॅन
व्हीआयकडे ३६५ दिवसांसाठी ३,०९९ रुपयांचा एक प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना रोजचा २ जीबी डेटा वापरायला मिळतो. तसेच दररोज १०० एसएमएसचा फायदा देखील या प्लॅनमध्ये मिळतो. या प्लॅनमध्ये Vi Hero अनलिमिटेड फायदे देखील मिळतात. तसेच Binge ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डीलाईटचा समावेश आहे. व्हीआयच्या या प्लॅनमध्ये ५० जीबी इतका अतिरिक्त डेटा आणि डिस्नी + हॉटस्टारचे मोबाईलचे सब्स्क्रिप्शन मिळते. ३,०९९ रुपयांमध्ये वापरकर्त्यांना ३६५ दिवस Vi Movies आणि TV VIP अॅक्सेस दिला जातो. ज्यामुळे वापरकर्ता मनोरंजनापर कंटेंटचा मनमुराद आनंद घेऊ शकतील. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
व्हीआयचा २,९९९ रुपयांचा प्लॅन
वापरकर्त्यांना डेटाची असलेली आवश्यकता पाहता ती गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीने २,९९९ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन ८५० जीबी इतका डेटा एकत्रितपणे देतो. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह ग्राहक Vi Movies आणि TV Classic चा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात.
व्हीआयचा २,८९९ रुपयांचा प्लॅन
व्हीआयच्या २,८९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच ग्राहक यामध्ये Vi Hero Unlimited मधील मिळणाऱ्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. ज्यामध्ये Binge All Night, Weekend Data Rollover, Data Delights यांचा समावेश आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि अतिरिक्त ५० जीबी डेटा यामध्ये मिळतो. तसेच वापरकर्त्यांना ३६५ दिवस Vi Movies आणि TV VIP ऍक्सेस दिला जातो. ज्यामुळे वापरकर्ता मनोरंजनाच्या कंटेंटचा मनमुराद आनंद घेऊ शकतील.
व्हीआयचा १ ,७९९ रुपयांचा प्लॅन
व्हीआयच्या १,७९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये एकूण २४ जीबी डेटा वापरायला मिळतो. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगशिवाय, ग्राहकांना ३,६०० एसएमएसचा लाभ मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना ३६५ दिवस Vi Movies आणि TV VIP ऍक्सेस दिला जातो. ज्यामुळे वापरकर्ता मनोरंजनाच्या कंटेंटचा मनमुराद आनंद घेऊ शकतील.