Vodafone-Idea ही भारतातील एक टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. मात्र काही कारणांमुळे कंपनीला देशामध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. लवकरच ५ जी नेटवर्क सुरू होण्याची शक्यता आहे. व्हीआय आपल्या ग्राहकांसाठी पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन लॉन्च करत असते. त्यामध्ये व्हीआयचा ४०१ रुपयांचा एक प्लॅन आहे ज्यामध्ये आकर्षक फीचर्स आणि अतिरिक्त फायदे मिळत असल्याने हा प्लॅन लोकप्रिय झाला आहे. तर या प्लॅनमध्ये कोणकोणते फायदे मिळतात ते पाहुयात.
व्हीआयच्या ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये SonyLIV मोबाइल सबस्क्रिप्शन
व्हीआयच्या ४०१ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहक आपल्या मनोरंजनाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या अनेक फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ३,००० एसएमएस प्रतिमहिना यासारख्या रेग्युलर फीचर्ससह वापरकर्त्यांना ५० जीबी डेटा दिला जातो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
विशेष ओव्हर -द -टॉप (OTT) या फायद्यांचा समावेश या प्लॅनला वेगळे ठरवते. ४०१ रुपयांचा प्लॅन घेतलेल्या ग्राहकांना १२ महिने म्हणजेच एका वर्षासाठी SonyLIV मोबाइल सबस्क्रिप्शनमध्ये प्रवेश मिळतो. ४० रुपयांचे दोन प्लॅन आहेत हे लक्षण घेणे आवश्यक आहे.
व्हीआयच्या ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये SunNXT प्रीमियम सबस्क्रिप्शन
पर्यायी मनोरंजनाचे पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी व्हीआय ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये आणखी एक सबस्क्रिप्शन ऑफर करते. हा प्लॅन निवडणाऱ्या गाहकांना त्यांच्या पॅकेजचा भाग म्हणून एका वर्षाचे SunNXT प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते. SunNXT प्रीमियममध्ये ग्राहकांना प्रादेशिक चित्रपट, टीव्ही शो, लाइव्हटीव्ही चॅनेल्स आणि विविध भाषांमधील अन्य कंटेंटचा आनंद घेता येतो.
व्हीआयच्या ४०१ रुपयांच्या दोन्ही प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळावा यासाठी अतिरिक्त फायदे ऑफर करते सदस्यांना Vi Movies आणि TV अॅपवर VIP प्रवेश मिळतो. ज्यामुळे त्यांना कधीही, कुठेही चित्रपट, टीव्ही शो आणि अन्य व्हिडीओ कंटेंट पाहता येतो. याशिवाय ZEE5 प्रीमियम सबस्क्रिप्शनसह अखंड मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात.