Vodafone Idea (Vi) भारतातील सर्वात मोठी तिसरी टेलिकॉम कंपनी आहे. तसेच कंपनीला अजूनही आपले ५जी नेटवर्क देशात लॉन्च करता आलेले नाही. मात्र ते लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असते. तसेच कंपनीकडे या पोर्टफोलिओ अंतर्गत काही फॅमिली प्लॅन्स देखील आहेत. यामध्ये ६०१ रुपयांचा फॅमिली प्लॅन हा व्हीआयचा सर्वात परवडणारा प्लॅन आहे. मात्र हा केवळ दोन कनेक्शनसाठीच उपलब्ध आहे.

वोडाफोनने अजून ५जी लॉन्च केले नाही. मात्र जर का तुम्ही अशा भागामध्ये रहात आहात जिथे टेलिकॉम कंपनीचे मजबूत नेटवर्क कव्हरेज आहे. तर याची पोस्टपेड प्लॅन्स अजूनही समाधानकारक असू शकतात. आज आपण व्हीआयच्या ६०१ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल बोलणार आहोत. यामध्ये मिळणारे फायदे याबद्दल जाणून घेणार आहोत. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : Best Smartphones Under 10000: रिअलमी Narzo N53 सह ‘हे’ आहेत दमदार फीचर्स असणारे स्मार्टफोन्स, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

Vodafone Idea : ६०१ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

व्हीआयचा ६०१ रुपयांचा प्लॅन एक प्रायमरी नंबर आणि एक सेकंडरी कनेक्शनसह येतो. प्रायमरी नंबरवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ३ हजार एसएमएस आणि ७० जीबी डेटा मिळतो. हा प्लॅन Binge All Night ऑफरसह येतो. तुम्ही दरदिवशी १२ ते ६ या वेळेत अनलिमिटेड डेटाचा वापर करू शकता. शेअरिंगसाठी १० जीबी डेटा मिळतो. यामध्ये २०० जीबी डेटाची रोलओव्हर सुविधा आहे.

यामध्ये वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतात. त्यामध्ये व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही, हंगामा म्युझिक इन व्हीआय अ‍ॅप, व्हीआय गेम्स, ६ महिन्यांसाठी ऍमेझॉन प्राईम (एकाच वेळी लाभ), १ वर्षासाठी डिस्नी + हॉटस्टार आणि सोनी लिव्ह मोबाइल आणि SunNXT प्रीमियम असे फायदे मिळतात. कुटुंबातील अतिरिक्त सदस्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, महिन्याला ३००० एसएमएस आणि ४० जीबी डेटा आणि १० जीबी डेटा शेअर करता येतो. या प्लॅनमध्ये २०० जीबी डेटा रोल ओव्हर करण्याची सुविधा मिळते.

हेही वाचा : पासवर्ड शेअरिंग बंद केल्यानंतर Netflix ने सादर अँड्रॉइड आणि iOS युजर्ससाठी सादर केले ‘हे’ टॅब; असा होणार फायदा

व्हीआयची ६०१ रुपयांचा फॅमिली प्लॅन हा काही एकमेव प्लॅन नाही तुम्ही व्हीआयचा १००१ आणि १,१५१ रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन देखील खरेदी रु शकता. या प्लॅन्समध्ये ४ आणि ५ कनेक्शनसह येतात. कनेक्शन खरेदी करण्यासाठी तुम्ही जवळच्या व्हीआय स्टोअरला भेट देऊ शकता.

Story img Loader