महागाईमुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली आहे. मोबाईल रिचार्ज प्लॅनही याला अपवाद नाहीत. सर्व मोबाईल कंपन्यानी रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. अशात प्रत्येकजण कमी किंमतीमध्ये जास्त ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतो. जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे सिम वापरत असाल आणि याच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर ८२ रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन नक्की ट्राय करू शकता.

आणखी वाचा – आता रेल्वे प्रवासादरम्यान जेवणाची चिंता मिटली! व्हाट्सअ‍ॅपवरून देता येणार ऑर्डर

वोडाफोन आयडियाच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळवा अनेक ऑफर

  • वोडाफोन आयडियाने काही दिवसांपुर्वीच हा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.
  • याची किंमत ८२ रुपये आहे.
  • या रिचार्ज प्लॅनमध्ये सोनीलिव (SonyLIV) प्रीमियमचे सबस्क्रीप्शन मिळते. हे सबस्क्रिप्शन २८ दिवसांसाठी उपलब्ध असते.
  • या रिचार्ज प्लॅनमध्ये UEFA चैंपियन लीग, WWE, Bundesliga आणि UFC या स्पोर्ट्सचा देखील समावेश करण्यात आला आहे.
  • स्पोर्ट्सचे कार्यक्रम, सोनीलिव प्रीमियम सबस्क्रिप्शन, इंटरनॅशनल कार्यक्रम पाहण्याची संधी अशी ऑफर यामध्ये उपलब्ध आहे.
  • तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ४ जीबी हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे.
  • या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा मेसेजची सेवा उपलब्ध नाही.

सोनीलिवचे हे सबस्क्रीप्शन केवळ मोबाईलसाठी उपलब्ध आहे. म्हणजे हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ते टीव्हीवर वापरता येणार नाही. सोनीलिवच्या सबस्क्रीप्शनची किंमत २९९ रुपये आहे. परंतु वोडाफोन आयडिया वापरकर्त्यांसाठी हे सबस्क्रीप्शन केवळ ८२ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. वोडाफोन आयडियाचे डिजनी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन देणारे असे आणखी प्लॅन उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत ४९९ रुपयांपासून ३,०९९ रुपयांपर्यंत आहे.

Story img Loader