Vodafone-Idea Prepaid Plans :एअरटेल, जिओ या कंपन्यांनंतर आता वोडाफोन-आयडियासुद्धा त्यांचे खास प्रीपेड प्लॅन घेऊन मार्केटमध्ये उतरली आहे. वोडाफोन-आयडिया ही देशातील सर्वांत मोठी तिसऱ्या क्रमांकांची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉंच करीत असते. या प्लॅन्स ग्राहकांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. तर, आता कंपनीने त्यांचे नवीन दोन प्रीपेड प्लॅन्स ग्राहकांसाठी आणले आहेत; ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल्स, एसएमएस, दैनंदिन डेटा आणि नेटफ्लिक्सच्या १९९ रुपयांच्या बेसिक प्लॅनचे फ्री सबस्क्रिप्शनसुद्धा मिळणार आहे.

व्हीआयचा ९९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

व्हीआयचा हा प्रीपेड प्लॅन ७० दिवसांसाठी वैध असेल. त्यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. त्याव्यतिरिक्त तुम्हाला नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनचे सबस्क्रिप्शन आणि दररोज १.५ जीबी डेटासुद्धा मिळणार आहे.

हेही वाचा…Netflix plans 2024: फक्त १४९ रुपयांत मिळणार नेटफ्लिक्सचे ‘मोबाईल सबस्क्रिप्शन’; जबरदस्त फायदे अन् ‘या’ चार प्लॅन्सची यादी पाहाच

व्हीआयचा १,३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

व्हीआयचा हा प्रीपेड प्लॅन ८४ दिवसांसाठी वैध असेल. त्यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल्स, दररोज १०० एसएमएस, २.५ जीबी डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनचे सबस्क्रिप्शनसुद्धा मिळणार आहे.

व्हीआयच्या रिचार्जवर दिल्या जाणाऱ्या फ्री नेटफ्लिक्सच्या बेसिक प्लॅनबद्दल जाणून घ्या –

या बेसिक प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या फोनशिवाय तुमचा टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा टीव्हीवर नेटफ्लिक्सचा कंटेन्ट पाहू शकता. हा प्लॅन फक्त प्रतिमहिना १९९ रुपयांचा; जो तुम्हाला या रिचार्जवर फ्री मिळेल. पण, नेटफ्लिक्सच्या या बेसिक प्लॅनमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स एका वेळी एकाच स्क्रीनवर ऑपरेट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला व्हिडीओची गुणवत्ता 720p रिझोल्युशनमध्ये उपलब्ध आहे.

व्ही गॅरंटी कार्यक्रम

या नवीन प्लॅन्सव्यतिरिक्त Vi ने अलीकडेच ‘Vi गॅरंटी प्रोग्राम’ लाँच केला आहे आणि त्यात एक मर्यादित कालावधीची ऑफर; ज्याचा उद्देश त्याच्या नेटवर्कवरील सर्व 5G आणि नवीन 4G स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी हाय-स्पीड डेटा सुनिश्चित करणे आहे. या प्रोग्रामअंतर्गत पात्र वापरकर्त्यांना एका वर्षाच्या कालावधीत १३० जीबी गॅरंटेड अतिरिक्त डेटा मिळणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

यापूर्वी एअरटेल आणि जिओ कंपनीने वार्षिक मोबाइल प्रीपेड प्लॅन्स आणि नेटफ्लिक्सने भारतात चार वेगवेगळे म्हणजेच मोबाइल, बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम आदी चार स्वरुपाचे प्लॅन ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. त्यातच आता व्हीआयने सुद्धा त्यांचे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहे ; जे ग्राहकांसाठी अगदीच फायदेशीर आहेत.