देशामध्ये Reliance Jio, Airtel आणि VI या प्रमुख तीन टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी देशामध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे. मात्र अजूनही वोडाफोन आयडीया कंपनीला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही आहे. आपले ५जी नेटवर्क सुरु करण्याचे व्हीआय मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. Airtel आणि Jio त्यांच्या ग्राहकांना 5G मोफत देत आहेत असे कारण सांगून व्हीआय कंपनी एअरटेल आणि जिओ या कंपन्यांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
भारतात ऑक्टोबर २०२२ या महिन्यामध्ये IMC इंडिया मोबाइल कांग्रेस) मध्ये ५जी नेटवर्क रोलआउट करण्यात आले होते. त्यानंतर तीन टेलिकॉम कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतात 5G रोलआउटसाठी स्टेज शेअर केला होता. मात्र आतापर्यंत अणि एअरटेल याच कंपन्यांना आपली ५जी सेवा सुरु करण्यात यश आले आहे.
हेही वाचा: एकाचवेळी WhatsApp Account चार डिव्हाइसवर कसे लिंक करायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स
वोडफोन आयडियाने केली जिओ आणि एअरटेलविरुद्ध तक्रार
Vi ने Trai ला एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये कंपनीने आपले प्रतिस्पर्धी असलेल्या कंपन्यांवर चुकीच्या किंमती लावल्या असल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे, Vi ने केलेल्या तक्रारीनंतर ट्रायने जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्स ने दिले आहे.
Airetl आणि Jio ने दिले उत्तर
व्हीआय ने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ट्रायने जिओ आणि एअरटेल या कंपन्याना आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. त्यावर जिओ आणि एअरटेलने आपले उत्तर देखील दिले आहे. TRAI अधिकार्यांच्या माहितीच्या आधारावर रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे , Airtel आणि Jio यांचा दावा आहे की त्यांची 5G सेवा मोफत नाही, कारण ग्राहकांना 5G वापरण्यासाठी 4G प्लॅन रिचार्ज करावा लागतो. एअरटेल आणि जिओने असेही म्हटले आहे की 1GB 5G डेटा ऑफर करण्याची किंमत 4G पेक्षा खूपच कमी आहे.
ट्रायच्या एका अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, “आम्ही त्यांना (जिओ आणि एअरटेलला) नोटीस दिली होती. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे. आता आणि आम्ही लवकरच निर्णय घेऊ. सध्या ट्रायची कायदेशीर टीम, फायनान्स टीम आणि टेक्निकल टीम या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत.