FIFA World Cup 2022: सर्व क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची वाट बघत होते त्या २३व्या फुटबॉल विश्वचषकाचा (23rd Football World Cup) थरार कतारमध्ये सुरू झालेला आहे. ऑलिम्पिक या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेनंतर सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारी स्पर्धा म्हणजे फुटबॉलचा हा कुंभमेळा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २११ देश जोडलेल्या फुटबॉलच्या सर्वोच्च संघटनेच्या म्हणजे फिफाच्या( FIFA) वतीने आयोजित या स्पर्धेचा थरार पूर्ण महिनाभर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आता आॅनलाईन गेमिंंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी चार जबरदस्त प्लॅन लाँच केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी चार नवीन प्लॅन लाँच केले आहेत. विशेष म्हणजे, हे प्लॅन आंतरराष्ट्रीय रोमिंग आहेत या प्लॅनमुळे ग्राहकांना परदेशात कॉलिंग आणि मोबाईल डेटा वापरता येईल. त्यासोबत कंपनी काही विशेष सुविधाही अगदी मोफत देत आहे. या प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

  • २,९९९ रुपयांचा रोमिंग प्लॅन

व्होडाफोन-आयडियाच्या २९९९ रुपयांच्या Vi रोमिंग प्लानची वैधता सात दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा, लोकल नंबर आणि २०० मिनिटे आउटगोइंग कॉल्स सारख्या सुविधा मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये ३५ रुपये प्रति मिनिट दराने इतर देशांना आउटगोइंग कॉल्स करता येणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना २५ एसएमएस देखील देत आहे.

(आणखी वाचा : मस्तच! Google चा ‘हा’ भन्नाट फीचर्स व्हॉट्सअॅपसारखं करेल काम; आता मजा होणार दुप्पट, पाहा काय आहे तुमच्यासाठी खास…)

  • ३,९९९ रुपयांचा रोमिंग प्लॅन

३,९९९ रुपयांच्या व्होडाफोन-आयडिया रोमिंग प्लानची वैधता १० दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय भारतातील आउटगोइंग कॉल आणि स्थानिक नंबरसाठी ३०० मिनिटे उपलब्ध आहेत. इतर देशांमध्ये, या प्लॅनद्वारे २५ रुपये प्रति मिनिट दराने कॉल केले जाऊ शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत इनकमिंग कॉल्स आणि ५० एसएमएस देखील देण्यात आले आहेत.

  • ४४९९ रुपयांचा रोमिंग प्लॅन

४,४९९ रुपयांचा Vi रोमिंग प्लॅन भारतात ५ जीबी डेटा, ५०० मिनिटे लोकल आणि टॉकटाइम ऑफर करतो. याशिवाय १०० एसएमएस देखील देण्यात आले आहेत. Vodafone Idea च्या या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. या प्लॅनसह, इतर देशांमध्ये कॉल करण्यासाठी ३५ रुपये प्रति मिनिट आकारले जातात. प्लॅनमध्ये इनकमिंग कॉल्स मोफत आहेत.

  • ५९९९ रुपयांचा रोमिंग प्लॅन

व्होडाफोन आयडियाचा हा सर्वात महागडा प्लान आहे. ५,९९९ रुपयांच्या Vi प्लॅनमध्ये, ग्राहकांना ५ जीबी मोबाईल डेटा, लोकल आणि आउटगोइंग कॉलसाठी ५०० मिनिटे मिळतात. याशिवाय इतर देशांना ३५ रुपये प्रति मिनिट दराने कॉल करता येणार आहे. Vodafone Idea च्या या प्लानमध्ये १०० एसएमएस आणि फ्री इनकमिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea has launched four new plans starting at rs 2999 these plans are international roaming plans that allow customers to use calling and mobile data abroad pdb