Vodafone-Idea टेलिकॉम कंपनीला अजूनही आपले ५जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. आर्थिक अडचणींमुळे या ५ जी च्या शर्यतीमध्ये व्हीआय अजूनही मागे आहे. मात्र कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ४जी रिचार्ज प्लॅन लॉन्च करतच असते. आताही कंपनीने असे दोन प्लॅन आणले आहेत. यात कमी कालावधीसाठी जास्त डेटाची आवशक्यता असते अशा वापरकर्त्यांना याचा फायदा होणार आहे.

VI ने २४ आणि ४९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. त्याला अनुक्रमे ‘Super Hour’ आणि ‘Super Day’ अशी नावे देण्यात आली आहेत. ज्या वापरकर्त्यांना कमी कालावधीमध्ये भरपूर डेटा वापरावा लागतो, त्यांच्यासाठी व्हीआयने हे प्लॅन्स आणले आहेत. कॉलेज प्रोजेक्टवर काम करताना, टीव्ही शो पाहण्यासाठी किंवा व्हिडीओ गेम खेळण्यासाठी या डेटा पॅकचा फायदा होऊ शकतो. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
mukta barve entry in colors marathi serial
Video : ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री! जबरदस्त लूक अन् प्रोमोने वेधलं लक्ष
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

हेही वाचा : Nokia ने लॉन्च केले UPI सपोर्ट असलेले ‘हे’ दोन स्वस्त फिचर फोन्स, HD व्हॉइस कॉलसह मिळणार…

‘हे पॅक व्हीआय प्रीपेड वापरकर्त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय डेटाचा मुक्तपणे वापर करण्यास सक्षम बनवतात, ज्यामुळे वापरकर्त्याला चांगला अनुभव मिळतो.’ असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले.

व्हीआयचा Super Hour प्रीपेड प्लॅन

व्हीआयचा सुपर Hour प्लॅन हा २४रुपयांचा आहे. यामध्ये वापरकर्त्याला एका तासासाठी अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा मिळते. हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर एका तासासाठी वापरकर्ते या प्लॅनचा आनंद घेऊ शकतात. एका तासानंतर या प्लॅनच्या नियमानुसार इंटरनेटचा स्पीड कमी होईल.

व्हीआयचा Super डे प्रीपेड प्लॅन

नावावरून लगेच लक्षात येते या प्लॅनची वैधता २४ तासांसाठी असणार आहे. हा प्लॅन ४९ रुपयांचा आहे. यात वापरकर्त्यांना ६ जीबी हाय स्पीड ४ जी इंटरनेट डेटा वापरण्यास मिळतो.

महत्वाचे म्हणजे या दोन्ही प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळत नाही. या सुविधांचा फायदा घेण्यासाठी वापरकर्त्यांकडे सक्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : VIDEO: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लॉन्च केले भारत 6G Alliance; जाणून घ्या सविस्तर

”हे पॅक विशेषतः तरुण आणि वयोवृद्ध लोकांसाठी तयार करण्यात आले आहेत ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता असते. यासह व्हीआय प्रीपेड वापरकर्ते चित्रपट पाहणे, व्हिडीओ स्ट्रीमिंग, गाणी ऐकणे, गेम खेळणे, गप्पा मारणे , काम आणि अभ्यास करणे अशा अनेक गोष्टींचा आनंद या प्लॅन्समधून घेऊ शकतात. या प्लॅन्सचा उपयोग वापरकर्ते VI गेम्स खेळण्यासाठी, व्हीआय मुव्हीस आणि टीव्हीवर चित्रपट व व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी तसेच व्हीआय म्युझिक ऐकण्यासाठी करू शकतात.” VI ने आपल्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे.