भारत देशामध्ये रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र अजूनही वोडाफोन आयडिया कंपनीला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही आहे. VI ने अजून ५ जी सेवा सुरु केली नसून यासाठी मोठ्या प्रमाणात कमी होणारी ग्राहकांची संख्या कारणीभूत आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांना टिकवून ठेवणे व ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आपले काही रिचार्ज प्लॅन अपडेट केले आहेत. या माध्यमातून एअरटेल आणि जिओला टक्कर देण्याचा पूर्ण प्रयत्न वोडाफोन-आयडिया करत आहे. तसेच कंपनीने ५४९ रुपयांचा एक नवीन प्लॅन देखील लॉन्च केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्लॅनला व्हीआयच्या वेबसाईटवर combo/validity सेक्शनमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे ज्यांना जास्त वैधता असणारे रिचार्ज प्लॅन हवा असतो. तर या नवीन प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

हेही वाचा : Vodafone-Idea ने अपडेट केले ‘हे’ दोन प्लॅन, आता वर्क फ्रॉम होम करणे होणार आणखीन सोपे

५४९ रुपयांचा वोडाफोन आयडियाचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

५४९ रुपयांचा व्हीआयचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना १८० दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला १ जीबी डेटा वापरायला मिळतो. तुम्हाला जर का अतिरिक्त डेटा हवा असेल तर तुम्हाला एक्सट्रा डेटा व्हाउचर खरेदी करावे लागेल.

व्हीआयच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला नॅशनल आणि लोकल कॉलिंगसाठी प्रति सेकंदाला २.५ पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा नाही. तसेच व्हीआयच्या या प्लॅनमध्ये एसएमएस करण्याची देखील सुविधा मिळणार नाही आहे. जे vi चे सिम हे अतिरिक्त पर्याय म्हणून वापरत असतील त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय आहे.

हेही वाचा : तुम्हाला तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर सॅमसंग वॉलेट ‘Scan and Pay’ जोडायचे आहे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

एअरटेल कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी ५४९ रुपयांचा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची वैधता ही ५६ दिवसांची आहे. यामध्ये २ जीबी डेटा प्रत्येक दिवशी वापरायला मिळतो. तसेच दररोज १०० एसएमएस देखील करता येतात. एअरटेल वापरकर्ते याप्लॅनसह Xstream अ‍ॅप अ‍ॅक्सेस, Apollo 24/7 circle आणि फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक , Wynk Music चा अ‍ॅक्सेस असे फायदे देखील मिळतात.

इतकेच नाहीतर रिलायन्स जिओ कंपनी देखील आपल्या ५३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा दररोज ऑफर करते. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस दररोज अशा सुविधा मिळतात. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये JIo Apps, जिओसिनेमा, जिओक्लाउड आणि जिओसिक्युरिटी यांची मोफत मेंबरशिप मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea launch 549 rs prepaid recharge plan for 180 days relaince jio and airtel plan tmb 01