Vodafone-Idea ही एक टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. व्हीआय भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे मात्र कंपनीला अजून आपले ५ जी नेटवर्क सुरू करता आलेलं नाही. लवकरच ते सुरू होण्याची शक्यता आहे. व्हीआयने वापरकर्त्यांसाठी चार नवीन इंटरनॅशनल रोमिंग पॅक लॉन्च केले आहेत. चारही प्लॅनमध्ये कोणत्याही अटींशिवाय अनलिमिटेड कॉल्स, SMS कंपनीने ऑफर केले आहेत.
व्हीआयचे नवीन इंटरनॅशनल रोमिंग रिचार्ज प्लॅनची सुरूवात ५९९ रुपयांपासून होते आणि शेवट ४,९९९ रुपयांपर्यंत होतो. हे प्लॅन तब्बल २९ देशांमध्ये कॉल्स, डेटा सारख्या सुविधा देतात. ज्यामध्ये इंग्लंड, थायलंड, UAE, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि अनेक देशांचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
व्हीआय वापरकर्ते या चारपैकी कोणताही रिचार्ज प्लॅन निवडण्यासाठी व्हीआयच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा व्हीआयचे App डाउनलोड करू शकतात. त्यानंतर ते प्लॅनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात. जे ६० दिवस अगोदर करता येऊ शकते.
व्हीआयचा सर्वात पहिला इंटरनॅशनल प्लॅन हा ५९९ रुपयांचा आहे. ज्यामध्ये अँलिमीएड मेसेज,डेटा आणि कॉलिंग ऑफर केले जाते. याची वैधता २४ तास म्हणजे एक दिवस इतकी आहे.
या प्रमाणेच यामधील पुढील प्लॅन आहे तो २,९९९ रुपयांचा. हा प्लॅन ७ दिवसांच्या वैधतेसह येतो. त्यातच १० दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत ही ३,४९९ रुपये इतकी आहे. शेवटी या चार प्लॅनमधील सर्वात महत्वाचा प्लॅन आहे तो म्हणजे ४,४९९ रुपयांचा. यामध्ये वापरकर्त्यांना १४ दिवसांची वैधता मिळते. वोडाफोन-आयडियाने हे चार इंटरनॅशनल रिचार्ज प्लॅन पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले आहेत.