वोडाफोन -आयडिया ही देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी स्पेशल नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना जास्त डेटा आणि अन्य सुविधा मिळतील अशा प्रकारचे प्लॅन्स आणत असते. या कंपनीने व्हॅलेंटाईन डे निमित्त काही खास प्लॅन्स आणि ऑफर आणल्या आहेत.
वोडाफोन-आयडिया आपले ग्राहक वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. काही प्लॅन्स आणत आहे ज्यामुळे लोकं वोडाफोन आयडियाची वापर करतील. कारण जिओ आणि एअरटेलने ५जी नेटवर्क लॉन्च केल्यामुळे त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कंपनीने प्रीपेड यूजर्ससाठी काही खास योजना आणि ऑफर आणल्या आहेत. याबद्दल जाणून घ्या.
वोडाफोन आयडियाचे वापरकर्ते २९९ रुपयांपेक्षा जास्तीचा रिचार्ज करत असतील तर त्यांना २८ दिवसांसाठी ५ जीबी अतिरिक्त डेटा फ्री मध्ये मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा या ५जीबी अतिरिक्त डेटासाठी तुम्हाला २९९ रुपयांच्या वरील रिचार्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे वापरकर्ते १९९ ते २९९ रुपयांच्या मधील कोणते रिचार्ज पॅक घेत असतील तर त्यांना २ जीबी अतिरिक्त डेटा २८ दिवसांसाठी दिला जाणार आहे. तुम्ही जर १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या आधी VI अॅप्लिकेशनद्वारे रिचार्ज केले तर या दोन्ही ऑफरचा फायदा तुम्हाला मिळणार आहे.
५००० रुपयांचा मिळणार फायदा
कंपनीने केवळ व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल प्लॅन आणला नाहीये तर ग्राहकांसाठी एक कॉन्टेस्ट देखील लॉन्च केली आहे. vodafone-idea ने ‘Vi Love Tunes Contest लॉन्च केली आहे. हे जिंकणाऱ्या ग्राहकांना ५,००० ररुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर कंपनी देणार आहे. यासाठी कंपनी तुम्हाला काही गाण्यांचे लिरिक्स ऐकवणार आहे आणि ते तुम्हाला ओळखावे लागणार आहे. VI च्या हंगामा म्युझिक व्हॅलेंटाईन प्लेलिस्टमध्ये तुम्हाला गाण्याचे लिरिक्स सापडतील. तसेच त्याचे योग्य उत्तर तुम्हाला #ViLoveTunes वर लिहायचे आहे. यावर कंपनी दररोज एका भाग्यवान ग्राहकाला ५,००० कॅशबॅक देणार आहे. ही कॉन्टेस्ट आजपासून सुरु झाली असून १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला VI चे अधिकृत Twitter, Facebook, Instagram हँडल देखील फॉलो करावे लागणार आहे.