वोडाफोन-आयडिया ही देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन-आयडिया (Vi) कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणि काही आकर्षक प्लॅन्स ऑफर करीत असते. कंपनीकडे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत; ज्यात ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. तसेच कंपनीकडे एका वर्षाची वैधता असणारेदेखील प्लॅन्स आहेत. जर एक वर्षाची वैधता असणारे प्लॅन तुम्ही शोधत असाल, तर तो प्लॅन कोणता आहे आणि त्यामध्ये कोणकोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊ.

तर आज आपण व्हीआयच्या (Vi) नवीन प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्रीपेड प्लॅन पूर्ण वर्षासाठी असणार आहे; ज्याची किंमत फक्त ३१९९ रुपये एवढी असेल. तसेच हा प्लॅन वापरकर्त्यांना संपूर्ण वर्षभर आकर्षक फायदे प्रदान करतो आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉल्स व १०० एसएमएस आदी गोष्टींचा समावेश आहे. तसेच या प्लॅनची एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲमेझॉनची एक वर्षाची प्राइम मेंबरशिपसुद्धा मिळणार आहे आणि तेसुद्धा कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता. याचा अर्थ वापरकर्ते व्हीआयच्या (Vi) खास प्लॅनमध्ये ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर चित्रपट, टीव्ही शो पूर्ण वर्षभर बघण्याचा आनंद लुटू शकणार आहेत.

selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
underground Ulhasnagars old electricity system is fulfilled with 16 84 crore funding approved
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती
underwater forest as vast as the Amazon What is there in this marine forest that connects six countries
ॲमेझॉनइतकेच अवाढव्य समुद्राखालचे जंगल? सहा देशांना जोडणाऱ्या या ‘समुद्री जंगला’त आहे तरी काय?
AI Identity and Opportunity career news
कृत्रिम प्रतिमेच्या प्रांगणात: एआय : ओळख आणि संधी
Elon Musk interferes in politics around the world
अमेरिकेपाठोपाठ जर्मनी, ब्रिटनच्या राजकारणातही इलॉन मस्कची लुडबूड? युरोपला उजव्या वळणावर नेण्याची योजना?
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क

कॉल, संदेश, ॲमेझॉन प्राइमसह व्हीआय वापरकर्ते त्यांचा नियमित २ जीबी डेटा वगळता मध्यरात्रीपासून ते सकाळी ६ पर्यंत अतिरिक्त डेटा वापरू शकणार आहेत; ज्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच यासह वीकेंड डेटा रोलओव्हर ऑफर करते. त्यात वापरकर्त्यांनी न वापरलेला डेटा त्यांना वीकेंडला पुन्हा वापरण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा…तुमचे नाव वापरून किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? अवघ्या एका मिनिटात घ्या जाणून; नाही तर…

व्हीआयच्या (Vi) ३,१९९ रुपयांच्या प्लॅनसह कंपनी आणखीन काही ऑफर घेऊन येत आहेत. १. ३,०९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी डिस्नी प्लस, हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. २. ९०३ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांचे सोनी लाइव्ह प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. ३. ९०३ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांचे सन एनएक्सटी (NXT) टीव्ही + मोबाइल दोघांसाठी उपयोगी सबस्क्रिप्शन आहे. ४. ९०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये मोबाइलसाठी डिस्नी प्लस हॉटस्टारचे ७० दिवसांचे सबस्क्रिप्शन आदी विविध प्लॅन व्हीआय (Vi) कंपनी ग्राहकांसाठी घेऊन आली आहे.

व्हीआयचे या उपक्रमामागील प्राथमिक उद्दिष्ट हे आहे की, वापरकर्ते सतत रिचार्जची चिंता न करता, वर्षभर कनेक्ट राहतील आणि त्यांचे मनोरंजनदेखील होत राहील. व्हीआयने या वार्षिक प्लॅनमध्ये अनेक फायदे दिले आहेत; ज्यातून वापरकर्त्यांना केवळ कनेक्टिव्हिटीच नाही, तर भरपूर मनोरंजनाचे पर्यायदेखील उपलब्ध झाले आहेत. स्वस्त रिचार्ज आणि सबस्क्रिप्शन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्लॅन बेस्ट ठरतील.

Story img Loader