भारत देशामध्ये रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र अजूनही वोडाफोन आयडिया कंपनीला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही आहे. VI ने अजून ५ जी सेवा सुरु केली नसून यासाठी मोठ्या प्रमाणात कमी होणारी ग्राहकांची संख्या कारणीभूत आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांना टिकवून ठेवणे व ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आपले काही रिचार्ज प्लॅन अपडेट केले आहेत. या माध्यमातून एअरटेल आणि जिओला टक्कर देण्याचा पूर्ण प्रयत्न वोडाफोन-आयडिया करत आहे. तसेच कंपनीने ३६८ आणि ३६९ रुपयांचे दोन नवीन प्लॅन्स देखील लॉन्च केले आहेत.

वोडाफोन – आयडियाने ३६८ आणि ३६९ रुपयांचे दोन नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. या दोन्ही प्लॅनच्या किंमतीमध्ये केवळ १ रुपयाचा फरक आहे. मात्र या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे फायदे हे वेगवेगळे असणार आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे फायदे जाणून घेऊयात.

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

हेही वाचा: सारखा सारखा रिचार्ज करायचा त्रास आता वाचणार! Vodafone-Idea ने लॉन्च केला १८० दिवसांची वैधता असणारा ‘हा’ प्लॅन

VI चा ३६८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

व्हीआयच्या ३६८ रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला ३० दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, १०० एसएमएस,दररोज असे फायदे मिळतात. याशिवाय सर्व वापरकर्त्यांना हिरो अनलिमिटेड बेनिफिट्सचा acess देखील मिळतो. विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डीलाईट्स,आणि बिंज ऑल नाईटचे फायदे मिळतात.

हेही वाचा: चारधामला जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! Reliance Jio ने लॉन्च केले 5G नेटवर्क; मिळणार ‘हा’ फायदा

VI चा ३६९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

व्हीआयने ३६८ रुप्यांसह ३६९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनदेखील लॉन्च केला आहे. या ३६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला तुम्हाला ३० दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, १०० एसएमएस,दररोज असे फायदे मिळतात.याशिवाय सर्व वापरकर्त्यांना हिरो अनलिमिटेड बेनिफिट्सचा acess देखील मिळतो. विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डीलाईट्स,आणि बिंज ऑल नाईटचे फायदे मिळतात. यामध्ये SonyLiv Premium OTT चा acess देखील मिळतो. या प्लॅनमध्ये हा एक अतिरिक्त फायदा मिळतो.