भारतामध्ये सध्या Reliance Jio, Airtel आणि Vodafone -Idea या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. यामध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी आपले ५ जी नेटवर्क देशभरामध्ये सुरु केले आहे. याचा वापरकर्त्यांना मोठा फायदा होत आहे. आता तिसरी मोठी कंपनी व्होडाफोन -आयडिया देखील आपले ५जी नेटवर्क लॉन्च करण्यासाठी तयार आहे. वोडाफोन आयडिया त्यांची ५जी सेवा सुरु करण्यासाठी निधीची तरतूद करत असून लवकरच ५जी सेवेचा लाभ वापरकर्त्यांना मिळणार आहे.

दूरसंचार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्हीआय कंपनी जून महिन्यापर्यंत निधी जमवू शकते. त्यानन्तर ५जी सेवा लॉन्च होऊ शकते. कंपनीने तिसऱ्या तिमाहीसाठी परवाना शुल्क आधीच क्लीअर केले आहे. त्यामुळे व्हीआय ५ जी ची स्पर्धा थेट जिओ आणि एअरटेलशी होणार आहे. याबाबतचे वृत्त  The New Indian Express ने दिले आहे.

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

हेही वाचा : रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखद होणार! लॉन्च झाले ‘हे’ जबरदस्त अ‍ॅप; नेटफ्लिक्ससह मिळणार…

आणखी एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे, व्हीआय फिनलँडची टेक कंपनी नोकियाशी ५जी उपकरणांबाबत चर्चा करत आहे. तसेच व्हीआय ५ जी चे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी नोकियाची मदत मिळू शकते. महत्वाचे नोकिया हा जिओ आणि एअरटेलचा देखील पुरवठादार आहे. व्हीआयची ५जी चाचणी आधीच पूर्ण झाली आहे. म्हणजेच ५जी सेवा लॉन्च होताच वापरकर्त्यांना ते वेगाने रोलआऊट करता येईल.

जेव्हापासून जिओ आणि एअरटेल यांनी आपली ५जी सेवा सुरु केली आहे. तेव्हापासून त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला व्हीआयच्या वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ५जी स्पीडचा वापर करण्यासाठी अनेकांनी आपले व्हीआय कार्ड पोर्ट करून घेतले. ५जी लॉन्च केल्यानंतर व्हीआय आपल्या वापरकर्त्यांची संख्या राखू शेकेल अशी अपेक्षा आहे.