Vodafone Idea Prepaid Plan Reduces Data : रिलायन्स जिओ, भारती एअरटेल व वोडाफोन आयडिया या भारतीय दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार या कंपन्या विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करीत असतात. अगदी एक दिवसापासून ते एक वर्षापर्यंतच्या प्लॅनचा यात समावेश असतो. तर आता वोडाफोन आयडिया ने (Vodafone Idea Prepaid Plan) आपल्या आपत्कालीन प्लॅनची (emergency plan) डेटा मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर, कंपनीने २३ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये (Vodafone Idea Prepaid Plan) बदल केला आहे. कंपनीचा हा २३ रुपयांचा प्लॅन डेटा व्हाऊचर असून, ज्या युजर्सना स्वस्तात अतिरिक्त डेटाची गरज आहे, ते याचा फायदा घेऊ शकतात या प्लॅनमध्ये पूर्ण दिवसाची वैधता मिळते. म्हणजेच १.२ जीबीचा डेटा दिला जातो; पण आता तो १ जीबी करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्लॅनमध्ये पूर्वीपेक्षा २०० एमबी कमी डेटा दिला जात आहे. प्लॅनची किंमत तशीच राहिली असली तरी युजर्सना आता नेहमीपेक्षा २०० एमबी कमी डेटा मिळेल. हा प्लॅन गेल्या वर्षी (२०२३) नोव्हेंबरमध्ये सादर करण्यात आला होता.
हेही वाचा…BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स
ज्या युजर्सना अतिरिक्त डेटाची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea Prepaid Plan) या कंपनीचा २६ रुपयांचा प्लॅनसुद्धा उपलब्ध आहे; जो संपूर्ण दिवसासाठी १.५ जीबी डेटा प्रदान करेल. हे दोन्ही प्लॅन्स रिचार्ज करण्यासाठी नंबरवर अॅक्टिव्ह प्लॅन असणे गरजेचे आहे. तसेच त्यांची वैधता एक दिवस असणे म्हणजे २४ तास नव्हे. ज्या दिवशी तुम्ही रिचार्ज कराल, त्या दिवसाच्या अखेरपर्यंतच डेटा उपलब्ध असेल. २३ रुपयांचा स्वस्त प्लॅन जुलैमध्ये मोबाईल दर वाढले असतानाही तसाच ठेवला गेला होता.
११ रुपयांचा प्लॅन
Vi च्या अलीकडील डेटा कपातीमुळे मार्केटमधील प्रीपेड डेटा पॅकमध्ये बदल दिसून आला आहे. कारण- जिओने अलीकडेच ३ नोव्हेंबर (२०२४) रोजी ११ रुपयांचा प्लॅन लॉंच केला आहे. पण, या प्लॅनची वैधता फक्त एक तासाची आहे. मात्र, Jio च्या या डेटा व्हाउचरमध्ये कंपनी युजर्सला अनलिमिटेड डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये १० GB हाय स्पीड डेटा मिळतो. त्यानंतर डेटाचा स्पीड ६४ केबीपीएस होईल.