भारत देशामध्ये रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र अजूनही वोडाफोन आयडिया कंपनीला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही आहे. VI ने अजून ५ जी सेवा सुरु केली नसून यासाठी मोठ्या प्रमाणात कमी होणारी ग्राहकांची संख्या कारणीभूत आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांना टिकवून ठेवणे व ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आपले काही रिचार्ज प्लॅन अपडेट केले आहेत. या माध्यमातून एअरटेल आणि जिओला टक्कर देण्याचा पूर्ण प्रयत्न वोडाफोन-आयडिया करत आहे. तसेच कंपनीने ५४९ रुपयांचा एक नवीन प्लॅन देखील लॉन्च केला होता. मात्र आता या ५४९ रूपयांच्या प्लॅनबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

वोडफोन आयडिया कंपनीने नुकताच आपला ५४९ रुपयांचा प्रीपेड रीचार्ज प्लॅन सादर केला होता. त्याची वैधता १८० दिवसांची होती. हा कंपनीचा हा लेटेस्ट लॉन्ग टर्म असणारा प्लॅन होता. ज्यामध्ये वापरकर्त्यांना १८० दिवसांची वैधता मिळणार होती. हा प्लॅन सुरू करून काही दिवस झालेले असतानाच हा प्लॅन कंपनीने बंद केला आहे. कंपनीने हा प्लॅन पोर्टफोलियोमधून काढून टाकला आहे. आता हा रीचार्ज प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवरून आणि मोबाइल App वरुन देखील काढून टाकण्यात आला आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
IRCTC website was down from Thursday morning make trouble for traveller
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद, प्रवाशांना मनस्ताप
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी

हेही वाचा : सारखा सारखा रिचार्ज करायचा त्रास आता वाचणार! Vodafone-Idea ने लॉन्च केला १८० दिवसांची वैधता असणारा ‘हा’ प्लॅन

५४९ रुपयांच्या रीचार्ज प्लॅनमधील फायदे

५४९ रुपयांचा व्हीआयचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना १८० दिवसांची वैधता मिळत होती. यामध्ये तुम्हाला १ जीबी डेटा वापरायला मिळणार होता. तुम्हाला जर का अतिरिक्त डेटा हवा असेल तर तुम्हाला एक्सट्रा डेटा व्हाउचर खरेदी करावे लागणार होता. व्हीआयच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला नॅशनल आणि लोकल कॉलिंगसाठी प्रति सेकंदाला २.५ पैसे मोजावे लागणार होते. म्हणजेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध नव्हता. तसेच व्हीआयच्या या प्लॅनमध्ये एसएमएस करण्याची देखील सुविधा मिळणार नव्हती. जे vi चे सिम हे अतिरिक्त पर्याय म्हणून वापरत असतील त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय होता.

एअरटेल कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी ५४९ रुपयांचा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची वैधता ही ५६ दिवसांची आहे. यामध्ये २ जीबी डेटा प्रत्येक दिवशी वापरायला मिळतो. तसेच दररोज १०० एसएमएस देखील करता येतात. एअरटेल वापरकर्ते याप्लॅनसह Xstream अ‍ॅप अ‍ॅक्सेस, Apollo 24/7 circle आणि फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक , Wynk Music चा अ‍ॅक्सेस असे फायदे देखील मिळतात.

Story img Loader