देशामध्ये सध्या वोडाफोन-आयडिया ही सर्वात मोठी तिसरी टेलिकॉम कंपनी आहे. याआधी जिओ आणि एअरटेलने देशामध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. मात्र व्हीआयला अजूनही आपले ५जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. लवकरच ते लॉन्च होण्याची शक्यता आहे. व्हीआय आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन प्लॅन्स लॉन्च करतच असते. वोडाफोन-आयडियाकडे त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्लॅन्स आहेत. ५० रुपयांपेक्षा कमी प्रीपेड डेटा व्हाउचर शोधत असलेल्या वापरकर्त्यांसाठी विविध फायद्यांसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
वोडाफोन-आयडिया कंपनीने १७ पेक्षा अधिक दूरसंचार सर्कल्सना प्राधान्य दिले आहे. तसेच त्या १७ ठिकाणी मोबाइल नेटवर्कवर आपली बहुतांश गुंतवणूक केली आहे. जेणेकरून ग्राहकांना मिळणार अनुभव नेहमीच चांगला राहील. आज आपण व्हीआयकडे ५० रुपयांच्या आतमधील कोणकोणते डेटा व्हाउचर आहेत त्याबद्दल जाऊन घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : कॅप्शन चुकलयं, चिंता करु नका; WhatsApp च्या ‘या’ फीचरच्या मदतीने करता येणार एडिट
वोडाफोन-आयडियाकडे ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक प्रीपेड डेटा व्हाउचर आहेत. यामध्ये सर्वात पहिले आणि परवडणारा प्लॅन आहे तो १७ रुपयांचा. व्हीआयचा १७ रुपयांचा डेटा व्हाउचर मोफत नाइट डेटा आणि १ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान अनलिमिटेड डेटा वापरायला मिळतो.त्यानंतर व्हीआयकडे १९ रुपयांचा व्हाउचर डेटा आहे ज्याची किंमत ५० रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये वापरकर्त्यांना एका दिवसासाठी १ जीबी डेटा मिळतो. त्यानंतर २४ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एका तासाची वैधता मिळते. या प्लॅनसह वापरकर्त्यांना खरोखर अनलिमिटेड डेटा वापरायला मिळतो.
तुम्हाला जर का जाहिरातमुक्त म्युझिक ऐकायला आवडत असेल तर तुम्ही २५ रुपयांचा डेटा व्हाउचर घेऊ शकता. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १ दिवसासाठी १.१ जीबी डेटा वापरायला मिळतो. व्हीआय App मध्ये हंगामाँ म्युझिकसह ७ दिवसांसाठी जाहिरातमुक्त म्युझिकचा अतिरिक फायदा मिळतो. यानंतर व्हीआयकडे २९ रुपयांचा डेटा व्हाउचर आहे. याची वैधता २ दिवसांसाठी असून यात २ जीबी डेटा मिळतो. तुम्हाला यापेक्षा जास्त डेटा हवा असल्यास तुम्ही ३९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. यात ३ जीबी डेटा ७ दिवसांच्या वैधतेसह येतो.