Reliance Jio , Airtel आणि VI या देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यामध्ये VI सोडून दोन्ही कंपन्यांनी आपली ५ जी सेवा देशातील अनेक शहरांमध्ये सुरु केली आहे. VI ने अजून ५ जी सेवा सुरु केली नसून यासाठी मोठ्या प्रमाणात कमी होणारी ग्राहकांची संख्या कारणीभूत आहे. यासाठी कंपनीने ग्राहकांना टिकवून ठेवणे व ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आपले काही रिचार्ज प्लॅन अपडेट केले आहेत. या माध्यमातून एअरटेल आणि जिओला टक्कर देण्याचा पूर्ण प्रयत्न वोडाफोन-आयडिया करत आहे. तसेच कंपनीने १८१ रुपयांचा एक नवीन प्लॅन देखील लॉन्च केला आहे.
VI चा १२९ रुपयांचा प्लॅन
वोडाफोन आयडियाच्या १२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच यामध्ये २०० MB कंपनीकडून ऑफर केले जाते. यामध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तथापि या प्लॅनमध्ये एसएमएस करण्याची सुविधा मिळत नाही. तर कंपनी लोकल एसएमएस करण्यासाठी १ रुपये. STD एसएमएससाठी १.५ रुपये आणि ISD एसएमएससाठी ५ रुपये आकारते.
VI चा २९८ रुपयांचा प्लॅन
वोडफोनच्या २९८ यांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनी ५० जीबी डेटा ऑर करते. त्यामध्ये व्हीआय Movies & TV Classic सह प्रीमियम मुव्ही,ओरिजनल शो, न्यूज आणि लाईव्ह टीव्हीचा Acess २८ दिवसांसाठी मिळतो. वोडाफोनचा हा प्लॅन Work From Home विभागांतर्गत येतो. म्हणजेच ज्यांना खास करून जास्त डेटा वापरावा लागतो.
हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार डेली १.५ जीबी डेटा, जाणून घ्या
VI चा १८१ रुपयांचा प्लॅन
वोडाफोन-आयडियाने नुकताच १८१ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची वैधता एकूण ३० दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला दररोज १ जीबी डेटा म्हणजेच महिन्याला ३० जीबी डेटा वापरायला मिळणार आहे.