व्होडाफोन आयडियाने वाय-फाय उपकरणांच्या जगात एक नवीन उत्पादन लाँच केले आहे. व्होडाफोनने पॉकेट साइज ४ जी राउटर व्ही एमआय-एफआय (Pocket Size 4G Router Vi Mi-Fi) लाँच केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की एमआय-एफआय राउटर १५० Mbps पर्यंतच्या स्पीडला सपोर्ट करतो. या उपकरणाद्वारे १० लोक एकाच वेळी डिव्हाइस कनेक्ट करू शकतात.व्ही एमआय-एफआय राउटर २७०० mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. एका चार्जवर हा राउटर ५ तास वापरता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व्ही एमआय-एफआय राउटरची किंमत २,००० रुपये आहे. हे राउटर व्होडाफोन-आयडियाच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनसह अॅड-ऑन म्हणून खरेदी केले जाऊ शकते. हे ३९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या पोस्टपेड प्लॅनसह देखील उपलब्ध आहे. कंपनी व्ही एमआय-एफआय ४जी पॉकेट साइज राउटरवर एक वर्षाची वॉरंटी देत ​​आहे.

(हे ही वाचा: WhatsAppने महिलांना दिली अप्रतिम भेट! ‘Bol Behen’ चॅटबॉट करणार तरुण मुलींची मदत)

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या

व्होडाफोन-आयडिया रिचार्ज योजना

व्होडाफोन-आयडिया ने २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान लॉंच केला आहे. हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. याशिवाय त्यात दररोज एसएमएस मिळतात. याशिवाय युजर्सना यामध्ये Binge Night, Weekend Data Rollover आणि Data Delight ऑफर्स मिळतात. याशिवाय Vi Movies आणि TV Classic अॅक्सेससाठी OTT सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

(हे ही वाचा: Internet Speed Test कशी करायची? Google वर लिहा फक्त ‘हे’ ३ शब्द)

अँड्रॉइड गेम्स

व्होडाफोन-आइडिया लिमिटेड(Vi) ने स्पोर्ट्स मीडिया कंपनी नज़ारा टेक्नोलॉजीज लिमिटेडसह भागीदारीत Vi app वर ‘Vi Games’ लॉंच करण्याची घोषणा केली आहे. या भागीदारीसह, व्होडाफोन आयडिया आपल्या सदस्यांसाठी गेमिंग सेवा सुरू करेल. व्ही गेम्सच्या नावाने सुरू होणारे, या गेमिंग सेवेअंतर्गत १४०० हून अधिक Android आणि HTML5 आधारित मोबाइल गेम्स उपलब्ध असतील. यात मोफत आणि सशुल्क असे दोन्ही मोबाइल गेम्स असतील.

Story img Loader