टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने अद्याप त्यांची 5G सेवा भारतात लाँच केलेली नाही, परंतु कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही नवीन प्लॅन लाँच केले आहेत. कंपनीने जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी अलीकडेच १८० दिवसांची वैधता असलेला ५४९ रुपयांचा प्लान सादर केला आहे. यानंतर जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी कंपनीने आणखी दोन प्लान लाँच केले आहेत. कंपनीने मागील बऱ्याच काळापासून मोठ्या संख्येने युजर्स गमावले आहेत, अशा परिस्थितीत नवीन प्लानमुळे कंपनीला फायदा होऊ शकतो.
या नवीन प्रीपेड प्लॅनची किंमत अनुक्रमे ३६८ आणि ३६९ रुपये आहे, या दोन्ही नवीन लॉन्च केलेल्या प्लॅन्सच्या किंमतीत फक्त १ रुपयांचा फरक आहे.
Vi चा ३६८ रुपयांचा प्रीपेड प्लान
Vodafone-Idea च्या ३६८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता दिली जात आहे. यात ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS सी सेवा दिली जाईल. संपूर्ण वैधता दरम्यान 60 GB डेटा उपलब्ध असेल.
याशिवाय SUN NXT सबक्रिप्शन देखील दिले जाईल. याशिवाय वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स, बिंज ऑल नाईट, Vi movies and TV चे सबस्क्रिप्शन दिले जाईल.
Vi चा 369 रुपयांचा प्रीपेड प्लान
जवळजवळ समान किंमतीप्रमाणे फायदे देखील समान आहेत. ३६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 2 GB डेटा, 100 SMS ची सेवा देण्यात आली आहे. या प्लानची वैधता ही ३० दिवसांची आहे. यासोबत वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स, बिंज ऑल नाईट. Vi movies,VI Hero सह बरेच फायदे समाविष्ट आहेत. या प्लानसोबत ग्राहकांना Sony LIVE app आणि TV apps चे सबस्क्रिप्शन दिले जाईल.
VI च्या ३६८ आणि ३६९ रुपयांच्या प्लानमध्ये फरक काय आहे?
VI चा ३६८ आणि ३६९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना लोकल आणि STD कॉलिंगसह अनलिमिटेड कॉलिंग, डेली 2GB डेटा आणि 100 SMS ची सुविधा मिळते. या दोन्ही प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. फक्त फरक एवढाच आहे की, दोन्ही प्लानमध्ये OTT सबस्क्रिप्शन ऑफर वेगळी आहे. यातील ३६८ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना SunNXT सबस्क्रिप्शन मिळते तर ३६९ रुपयांच्या प्लानमध्ये Sony LIVE app चे सबस्क्रिप्शन दिले जाते.
Vi चा ५४९ रुपयांचा प्लॅन
या प्लानची वैधता १८० दिवसांची आहे. यासोबत 1 जीबी डेटा दिला जात आहे. STD कॉलिंगसाठी 2.5 पैसे/सेकंद दराने शुल्क आकारले जाईल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात नाही. यामध्ये SMS चीही सुविधा नाही. हा प्लान त्यांच्यासाठी आहे ज्यांना Vi चे सिम दुय्यम सिम म्हणून वापरायचे आहे.