वोडफोन-आयडिया ही भारतातील एक टेलिकॅाम कंपनी आहे. मात्र या कंपनीला अजून आपले ५ जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. व्हीआयचे असे काही व्हाउचर प्लॅन आहेत ज्यात OTT चे फायदे ग्राहकांना मिळतात. यासह कंपनी लवकरच आपले ५ जी नेटवर्क सुरू करण्याची शक्यता आहे. तर व्हीआयचे असे कोणकोणते प्लॅन आहेत ते पाहुयात.

वोडफोन -आयडियचा १५१ रूपयांचा रीचार्ज प्लॅन

वोडफोन-आयडीयाचा १५१ रूपयांचा व्हाउचर प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता मिळते. तसेच 8 जीबी डेटा मिळतो. तसेच Disney+ Hotstar चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळते. Disney+ Hotstar सह लोकप्रिय चित्रपट, टीव्ही शो आणि अन्य कंटेंटचा आनंद घेऊ शकतात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

हेही वाचा : Intel इंडियाच्या प्रमुख निवृत्ती राय यांचा २९ वर्षांनी राजीनामा, कसा राहिला कंपनीमधला प्रवास?

वोडफोन -आयडियचा ८२ रूपयांचा रीचार्ज प्लॅन

वोडाफोन-आयडियाच्या या ८२ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४ जीबी डेटा वापरायला मिळतो. तसेच १४ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये २८ दिवसांसाठी Sony Liv चे मोबाइलचे सबस्क्रिप्शन मिळते. सोनी लिवच्या मोबाइल सबस्क्रिप्शनमध्ये भरपूर कंटेंट म्हणजेच चित्रपट, टीव्ही शो, लाईव्ह स्पोर्ट्स आणि अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

वोडफोन -आयडियचा ६९८ रूपयांचा रीचार्ज प्लॅन

जर का तुम्ही लॉन्ग टर्म OTT फायदा असणारा प्लॅन शोधत असाल तर व्हीआयचा ६९८ रूपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उपयोगी आहे. त्यामध्ये २८ दिवसांच्या वैधतेमध्ये मिळतो. त्यामध्ये ग्राहकांना १० जीबी डेटा वापरायला मिळतो. त्यामध्ये सोनी लिव मोबाइलचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

या डेटा व्हाऊचरसाठी वापरकर्त्यांकडे बेस अ‍ॅक्टिव्ह प्रीपेड प्लॅन असणे आवश्यक आहे. कंपनी हे प्लॅन्स स्वतंत्रपणे ऑफर करत नाही. वापरकर्ते या प्लॅन्सचा लाभ व्हीआयची वेबसाईट किंवा मोबाइल App द्वारे घेऊन शकतात. त्यात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हे कंपनीने आणलेले नवीन प्लॅन नसून, व्हीआयने ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले विद्यमान पर्याय आहेत.