Google Pay AI Voice command Feature : सध्या अगदी एक रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत कोणाला पैसे पाठवायचे असतील तरीही गूगल पे त्यासाठी आपल्याकडे २४ तास अव्हेलेबल आहे. एखादी वस्तू घेतली की व्यापाऱ्याकडून किंवा दुकानदाराकडे स्कॅनर मागून, मोबाइलमधील गूगल पे ॲप उघडून स्कॅनरच्या मदतीने पेमेंट करून टाकायचे. पण, अनेकदा हे करताना अमाऊंट (किंमत) च्या जागी चुकून पिन टाकला जातो आणि घोळही होऊ शकतो. तर आता अशा चुका होऊ नये म्हणून की काय गूगल पे आपल्या सगळ्यांसाठीच खास फीचर (Voice Assistance Feature) घेऊन येतो आहे.
गूगल पे युजर्स एआय फीचर्सचा लाभ घेण्यासाठी तयार आहेत. आता फक्त बोलून यूपीआय पेमेंट करता येणार आहे, असे सांगितले जात आहे. भारतातील Google Pay चे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक, शरथ बुलुसु यांनी सांगितले की, हे व्हॉइस फीचर ॲपद्वारे (Voice Assistance Feature) डिजिटल पेमेंट करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ करेल. पण, या फीचर्सबद्दलची माहिती सध्या मर्यादित आहे. पण, तरीही व्यवहारांसाठी यूपीआयवर अवलंबून राहणाऱ्या सर्वांसाठी हा अपडेट वा फीचर गेमचेंजर ठरू शकतो. .
व्हॉईस फीचर (TVoice Assistance Feature) :
गूगल पेमध्ये व्हॉईस कमांड्स सुरू केल्यामुळे जे अशिक्षित आहेत त्यांनाही ऑनलाइन पेमेंट करणे अधिक सोपे होईल. कारण फक्त बोललेल्या सूचनांद्वारे व्यवहार हाताळायचा असणार आहे, म्हणूनच ट्रान्सफॉर्मेटिव्ह व्हॉईस फीचर लवकरच लाँच केले जाईल. कारण Google ने स्थानिक भाषांमध्ये पेमेंट फॅसिलिटी सुलभ करण्याच्या उद्देशाने AI प्रकल्पावर भारत सरकारबरोबर सहयोग केला आहे.
या व्यतिरिक्त, भारतात सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी गूगल मशीन लर्निंग आणि एआय तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे, त्यामुळे हे फीचर वा अपडेट (Voice Assistance Feature) ग्राहकांना ऑनलाइन घोटाळे आणि धोक्यांपासून सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल. भारतातील विस्तीर्ण ऑनलाइन बाजारपेठ पाहता, Google या क्षेत्रात नावीन्य आणण्यास उत्सुक आहे.
गूगल पेचे मार्केट प्रेझेन्स (Google Pay’s Market Presence ) :
भारतात फोन पे आणि गूगल पे यूपीआय पेमेंट लँडस्केपवर वर्चस्व गाजवतात. नोव्हेंबर २०२४ च्या अहवालानुसार, एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये गूगल पेचा ३७ टक्के वाटा आहे, तर फोन पेकडे ४७.८ टक्के वाटा आहे. त्यामुळे एकूण भारतातील UPI बाजारपेठेत या प्लॅटफॉर्मचा वाटा ८० टक्क्यांहून अधिक आहे; तर आगामी व्हॉइस फीचर्ससह अधिक युजर्स त्यांच्या व्यवहाराच्या गरजांसाठी Google Pay कडे वळतील आणि त्याचा वापरकर्ता आधार आणखी वाढेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.