VU Glo LED TV Launched in India: कॅलिफोर्नियाची कंपनी Vuने भारतात आपला ‘Vu Glo LED TV 43’ हा नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. Vu Glo LED TV मालिका भारतात प्रथम सप्टेंबर २०२२ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. या मालिकेत आता ३०००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ४३ इंच स्क्रीनसह नवीन टीव्ही दाखल झाला आहे. नवीन Vu Glo LED TV आकर्षक वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आला आहे. जाणून घ्या या स्मार्ट टीव्ही संबंधी अधिक माहिती.
Vu Glo LED TV वैशिष्ट्ये
Vu Glo LED TV मध्ये ४३ इंच स्क्रीन आहे जी 4K रिझोल्युशन देते. स्क्रीन HDR10, डॉल्बी व्हिजन आणि अॅम्बियंट लाइट सेन्सरला सपोर्ट करते. ऑडिओबद्दल बोलायचे झाले तर Vu च्या या स्मार्ट टीव्हीला डीजे-क्लास बिल्ट-इन सबवूफर देण्यात आला आहे.
या स्मार्ट टीव्हीमध्ये ८४W साउंड आउटपुट आहे. स्पीकर्स डॉल्बी ऑडिओ आणि डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतात. टीव्हीमध्ये दिलेल्या प्रगत क्रिकेट मोडसह, १०० टक्के चेंडू दृश्यमानता आणि थेट स्टेडियमचा अनुभव उपलब्ध आहे.
Vu Glo LED TV ४३ स्मार्ट टीव्हीमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर आहे जो ड्युअल-कोर GPU आणि Vi Glo AI प्रोसेसरसह येतो. या टीव्हीमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज आहे. हा एक Google TV असून नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ सारख्या OTT अॅप्ससह पूर्व-इंस्टॉल केलेला आहे.
Vu Glo LED TV 43 गेमिंगसाठी व्हेरिएबल रिफ्रेश रेट (VRR) आणि ऑटो लो लेटन्सी मोड (ALLM) वैशिष्ट्ये ऑफर करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.0, तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट आहे.
Vu Glo LED TV 43 किंमत
Vu Glo LED TV 43 Smart TV ची किंमत २९,९९९ रुपये आहे. हा टीव्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर २७ नोव्हेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.