जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम जगातील नोकऱ्यांवर झाला आहे. अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. यामध्ये एका मनोरंजन क्षेत्रातील कंपनीचासुद्धा समावेश आहे.

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या डिस्ने कंपनीने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरविले आहे. बिझनेस इनसाईडरच्या रिपोर्टनुसार डिस्ने एप्रिल महिन्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत होती. त्यानुसार कंपनीने आता कर्मचारी कपात करण्याचे प्लॅनिंग सुरु केले असून यामध्ये तब्बल ४,००० कर्मचारी प्रभावित होणार आहेत.

वॉल्ट डिस्ने कंपनीची कर्मचारी कपात करण्याची ही काही पहिली वेळ नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपनीने तब्बल ७,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी ही दुसरी टाळेबंदीची योजना बनवली आहे. बॉब इगर यांनी फेब्रुवारीमध्ये कंपनीच्या वेतनात कपात करण्याची घोषणा केली.

हेही वाचा : चीन लवकरच टेलिकॉम क्षेत्रात नवीन पाऊल टाकणार? ‘या’ निर्णयामुळे अमेरिकेची वाढली चिंता

वॉल्ट डिस्नेने याआधी मोठी कर्मचारी कपात केली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी ४,००० लोकांना कामावरून काढून टाकू शकते. कपातीच्या दुसऱ्या फेरीशी संबंधित अंतर्गत मेमो देखील कंपनीमध्ये शेअर केला गेला आहे. हे सूचित करते की कंपनी हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकणार आहे.

ही कर्मचारी कपात कंपनीच्या अनेक विभागांमधून केली जाणार आहे. यामध्ये Disney Entertainment, ESPN, Disney Parks आणि Experiences & Products सारख्या बिझनेस सेगमेंटमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.तथापि , कपातीमुळे पार्क आणि रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या फ्रंटलाईन कामगारांवर काही परिणाम होईल अशी सध्या तरी शक्यता कमी आहे.

हेही वाचा : तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील Google Assistant हे फिचर बंद कसे करायचे माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

डिस्ने एंटरटेनमेंटचे सह-अध्यक्ष अ‍ॅलन बर्गमन आणि डाना वॉल्डन यांनी हा मेमो लिहिला आहे. या मेमोमध्ये ते म्हणाले, ”कंपनीचे भविष्य सुधारण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ नेतृत्व काम करत असल्याचे सांगितले.” कंपनीचा पहिला प्रयत्न हा आहे की वेगाने धावण्याऐवजी योग्य मार्गावर चालले पाहिजे. मेमोमध्ये पुढे म्हटले आहे की हा काळ चढ-उतारांनी भरलेला आहे. त्यांनी संयम बाळगल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader