दिवाळी म्हटलं की, खरेदी- विक्री अर्थातच रूपयांची आदान प्रदान. प्रत्येकजण दिवाळीत काहीतरी वस्तूंची खरेदी करून आपली दिवाळी साजरी करतो. त्यात स्मार्टफोन सर्वांना प्रियचं असतो. या काळात अर्थचक्र मोठया प्रमाणात तेजीत असतं. हीच वेळ साधून व्यापारी संधीचं सोनं करतात. हे विश्लेषण एका तज्ज्ञांनी सादर केलं आहे. त्यांच्या मते, दिवाळीत “रुपयाच्या अवमूल्यनाचा नक्कीच किमतींवर परिणाम होईल. एप्रिलपासून डॉलरच्या तुलनेत रुपया ९ टक्क्यांनी घसरला आहे. परिणामी, भारतात आयात खर्चातही वाढ झाल्याने भारतीय चलनाची घसरण हा एक धक्का असेल. त्यामुळे दिवाळीनंतर मोबाईलच्या किमतीत ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोनच्या किमती वाढतील

भारतातील स्मार्टफोन निर्माते चलनातील चढ उतारांवर लक्ष ठेवून आहेत. कारण ते अजूनही सेमी-नॉक्ड डाउन (एसकेडी) किटमधून फोन तयार करण्याऐवजी एकत्रित करतात. त्यामुळे अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी कंपन्या डिस्प्ले आणि इंटिग्रेटेड सर्किट्स सारखे भाग अंशतः डिस्सेम्बल अवस्थेत आयात करतात. कमकुवत रुपयामुळे अशा भागांची आणि तयार उत्पादनाची किंमत वाढते. याच कारणांवरून आता स्मार्टफोनच्या किमती वाढतील.

आणखी वाचा : दमदार बॅटरीसह Oppo A17k स्मार्टफोन भारतात लाँच; किंमत फक्त…

दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

सध्या दिवाळीच्या हंगामात ह्या उपकरणांच्या किंमती स्थिर दिसत असल्या तरी दिवाळीनंतर मात्र, इलेक्ट्रॉनिक उत्पादक कंपन्या दरवाढीच्या पवित्र्यात आहेत. बहुतेक स्मार्टफोन विक्रेत्यांसाठी सीकेडी सुमारे ९७-९८ टक्के आहे. उत्पादकांनी आयात केल्यास त्यांना अतिरिक्त परकीय चलन द्यावे लागेल. डॉलरची मजबूती आणि रुपयाची घसरण यामुळे विक्रेत्यांवर आणखी परिणाम होणार आहे. रुपयाच्या घसरणीमुळे मोबाईलसह टीव्ही-फ्रिज, वॉशिंग मशिनसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती दिवाळीनंतर ५ ते ७ टक्क्यांनी वाढू शकतात. या वर्षी एप्रिलपासून रुपया नऊ टक्क्यांनी आणि गेल्या सहा महिन्यांत १२ टक्क्यांनी घसरला आहे.

काय म्हणताय तज्ज्ञ?

काउंटरपॉइंट रिसर्चचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक प्रचीर सिंग यांच्या मते, सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर (स्मार्टफोन) किमती पाच ते सात टक्क्यांनी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. विक्रेते कमजोर रुपयाचा आणखी दबाव सहन करू शकत नाहीत आणि ते ग्राहकांना द्यावे लागतील. असं त्यांचं मत आहे. त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तू किवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर दिवाळीचा हा महिना आपल्यासाठी बचतीचा असू शकते.

Story img Loader