जगभरात युट्यूबच्या वापरकर्त्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. परंतु ज्यावेळी वापरकर्ते युट्यूबवर व्हिडीओ पाहत असतो, त्यावेळी अचानक मध्येच वेळखाऊ आणि कंटाळवाण्या जाहिराती आल्यानंतर लोकांचा हिरमोड होत असतो. त्यामुळं व्हिडिओत देण्यात येणाऱ्या माहितीची लिंक तर हुकतेच, याशिवाय वेळही वाया जातो. परंतु आता या समस्येवर मात करण्यासाठी युट्यूबकडून एक भन्नाट उपाय जारी करण्यात आला आहे.
जर तुम्हाला जाहिराती शिवाय युट्यूब व्हिडीओ बघायचे असतील तर तुम्हाला आता पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यासाठी ‘YouTube Vanced’ हे अतिशय लोकप्रिय ॲप आहे. याच्या मदतीने वापरकर्ते जाहिराती शिवाय युट्यूब व्हिडिओ पाहू शकतात. यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शनचे पैसे तुम्हाला भरावे लागणार नाही.
(हे ही वाचा :Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नवीन डिझाइनसह झाले लाँच; सर्व काही सविस्तर जाणून घ्या)
‘YouTube Vanced’ ही सेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. पण YouTube Vanced अजूनही बहुतांश वापरकर्त्यांसाठी कार्यरत आहे. त्याची लोकप्रियताही खूप वेगाने वाढत चालली आहे. जगभरात लाखो लोक हे ॲप वापरतात. पण, गुगलकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर कंपनीने ही सेवा बंद करण्याची घोषणा केली. तरीही तुम्हाला थर्ड पार्टी साइटवरून हे ॲप इंस्टॉल करता येईल. हे ॲप फक्त अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.