टेक्नॉलॉजी क्षेत्र हे खूप विस्तारलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आणि प्रगती होत आहे. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक क्षेत्रामध्ये कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये Apple WWDC इव्हेंट, रिअलमी आणि सॅमसंगने स्मार्टफोनच्या नवीन सिरीज लॉन्च केल्या आहेत. केरळ राज्याने मोफत इंटरनेटची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. अशा अनेक घडामोडी मागील आठवड्यामध्ये घडल्या आहेत. त्या पाहुयात.

Apple WWDC इव्हेंट 2023

मागच्या आठवड्यामध्ये Apple चा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने रिऍलिटी हेडसेट, १५ इंचाचा मॅकबुक एअर, ios १७ चे अपडेट आणि अनेक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. या इव्हेंटची सुरूवात कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्या भाषणाने झाली.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
train accident man saved a life of another man who was standing on a railway track Viral video
बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO
Mother saved her daughter from an accident video went viral on social media
हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

हेही वाचा : Apple WWDC 2023 : अ‍ॅपलने Mixed Reality हेडसेट, iOS 17 सह लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट्स, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

महिलेने AI वापरून बनवला नवरा

सध्याच्या काळामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर वाढताना दिसून येत आहे. AI माणसांच्या नोकऱ्या खाणार का असा प्रश्न सर्वांना पडत आहे. तसेच AI च्या धोक्यांबाबत अनेक दिग्गज लोक वादविवाद करत आहे. मात्र अमेरिकेतील एका महिलेला या टेक्नॉलॉजीने ‘परफेक्ट नवरा’ शोधण्यास मदत केली. काय आहे हे प्रकरण ते जाणून घेऊयात. AI टेक्नॉलॉजी एका महिलेला या टेक्नॉलॉजीने ‘परफेक्ट नवरा’ शोधण्यास मदत केली आहे. न्यूयॉर्कमधील ३६ वर्षीय रोझना रामोस या महिलेने ‘एरेन कार्टल’ नावाच्या पुरुषाशी लग्न केले. अ‍ॅटॅक ऑन टायटन’ नावाच्या एनिमेवरील लोकप्रिय पात्रापासून प्रेरित होऊन, रामोसने २०२२ मध्ये Replika AI वेबसाइट वापरून ‘एरेन कार्टल’ तयार केले आहे. हा सर्वात परफेक्ट नवरा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

Samsung ने लॉन्च केला Galaxy F54 

Samsung ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. असाच एक नवीन स्मार्टफोन कंपनीने भारतामध्ये लॉन्च केला आहे. Galaxy F54 हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. नवीन Samsung Galaxy F54 मध्ये ६.७ इंचाचा स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० Hz इतके आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले मिळतो. मोबाईलच्या डिस्प्लेचे नुकसान होऊ नये म्हणून स्क्रीनवर गोरिला ग्लासचे ५ कोटिंग देण्यात आले आहे. नव्याने लॉन्च झालेला सॅमसंग Galaxy F54 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. Samsung Galaxy F54 या फोनची सुरूवातीची किंमत ही भारतामध्ये २७,९९ रुपये आहे.

केरळमध्ये मोफत इंटरनेटची घोषणा

केरळ सरकारने इंटरनेटबाबत एक घोषणा केली आहे. केरळ सरकार दारिद्र्यरेषेखाली (BPL )असणाऱ्या २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबाना मोफत इंटरनेट सेवा देण्याच्या दृष्टीने राज्यभरामध्ये केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (KFON) सुरू केले आहे. KFON ची अधिकृत घोषणा झाल्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात उतरला आहे. रिपोर्टनुसार,७ हजार कटुंबाना मोफत इंटरनेटची सुविधा मिळाली आहे. राज्यामध्ये इंटरनेट हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याची घोषणा सत्ताधारी पक्षाने केली आहे. KFON ही स्वतःची इंटरनेट सेवा असलेले केरळ पहिले राज्य आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १५ MBPS च्या स्पीडप्रमाणे डेली १.५ जीबी डेटा मिळणार आहे.

हेही वाचा : Weekly Tech Updates: मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेल्या ‘जुगलबंदी’ चॅटबॉटपासून ते रिलायन्स जिओचा फॅमिली रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

जुलै महिन्यात होणार सॅमसंगचा ‘Unpacked’ इव्हेंट

Samsung ही एक टेक कंपनी आहे. कंपनी अनेक प्रॉडक्ट्स आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च करत असते. सॅमसंग कंपनी एक दक्षिण कोरियन कंपनी आहे. सॅमसंगचा एक इव्हेंट होणार आहे त्याबद्दल कंपनीने काही माहिती दिली आहे. बुधवारी सॅमसंगने सांगितले कंपनी आपला पुढील ‘Unpacked’ इव्हेंट लवकरच आयोजित करणार आहे. हा इव्हेंट दक्षिण कोरिया येथे आयोजित केला जाणार आहे.

फिंगरप्रिंट, फेसअनलॉकच्या मदतीने करता येणार साइन इन

हल्लीच्या काळामध्ये स्मार्टफोन हे मानवाचे अत्यंत महत्वाचे साधन बनले आहे. लोकं अँड्रॉइड आणि iOs असे दोन प्रकारचे फोन वापरतात. Google ने Android डिव्हाईससाठी नवीन साइन-अप पर्यायासाठी Passkey चा सपोर्ट जारी केला आहे. हे फिचर याआधी पर्सनल अकाउंटसाठी अतिरिक्त साइन इनचा पर्याय म्हणून लॉन्च करण्यात आले होते. मात्र आता या फीचरला वर्कस्पेस अकाउंट आणि गुगल क्लाउड अकाउंटसाठी देखील लॉन्च करण्यात आले आहे. आता या फीचरच्या मदतीने पासवर्ड न टाकता लॉग इन करता येते. Passkey एक युनिक डिजिटल आयडेंटिटी आहे जी आपल्या डिव्हाईस स्टोअर असते. 

ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

OpenAI ने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. ओपनएआयचे सीईओ आणि चॅटजीपीटीचे निर्माते सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सॅम ऑल्टमन यांनी आपल्या भारत भेटीतील दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सॅम ऑल्टमन यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सॅम ऑल्टमन यांना धन्यवाद दिले आहेत. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे गेले काही दिवसांपासून भारतामध्ये आहेत. त्यांनी आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच G20 शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांची देखील भेट घेतली आहे. आयआयटी दिल्लीमधील एका कार्यक्रमात भाग घेऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

आता मोबाइलवर मोफत पाहता येणार आशिया कप

नुकतीच IPL 2023 ही स्पर्धा पार पडली. यावर्षीचे विजेतेपद हे चेन्नई सुपर किंग्स या टीमने पटकावले. संपूर्ण आयपीएल स्पर्धा JioCinema वर पाहता येत होती. मोफत स्पर्धा दाखवल्यामुळे जिओसिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यापाठोपाठ आता डिस्नी + हॉटस्टार प्लॅटफॉर्मने देखील आशिया कप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपचे मोबाइलवर मोफत स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Reliance Jio ने एकाच वेळी लॉन्च केले ५ प्रीपेड प्लॅन्स, बरोबर मिळतेय ‘या’ अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन

Reliance Jio ही भारतातील एक प्रमुख आणि सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीने सर्वात पहिल्यांदा आपले ५ जी नेटवर्क देशामध्ये सुरू केले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन रीचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. आता देखील कंपनीने आपले ५ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. रिलायन्स जिओने गाण्यांची आवड असणाऱ्यांसाठी ‘Jio Saavan Pro’ सब्स्क्रिप्शनसह नवीन bundled प्रीपेड मोबाईल रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. ग्राहकांची मोबाइल कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक सब्स्क्रिप्शनची गरज हे प्लॅन पूर्ण करतील असे कंपनीचे म्हणणे आहे. 

गुगल, अ‍ॅमेझॉननंतर मेटामध्ये होणार AI चा वापर

मागील काही महिन्यांपासून आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर वाढल्याचे पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या कंपन्या AI चा समावेश आपल्या कामामध्ये करत आहेत. मेटाने देखील या तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली आहे. मेटाच्या फेसबुक मेसेंजर या अ‍ॅपमध्ये यूजर्संना चॅटजीपीटी स्टाईल प्रॉम्प्टचा वापर करुन स्टिकर्स बनवणे शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त मेटा कंपनी;च्या इतर प्रकल्पांमध्येही AI Tech पाहायला मिळणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Twitter जाहिरातींच्या मोबदल्यात कन्टेंट क्रिएटर्संना देणार पैसे

Twitter हा सध्याचे आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतासह जगभरातील असंख्य लोक ट्विटरचा वापर करत आहेत. काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू टिक संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला होता. ट्विटर कन्टेंट क्रिएटर्संना जाहिरातीच्या मोबदल्यात पैसे देणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले.“काही आठवड्यांमध्ये ट्विटर क्रिएटर्संना ads चा मोबदला म्हणून पैसे द्यायला सुरुवात करेल. प्रथम ब्लॉक पेमेंट हे एकूण $5M असणार आहे. लक्षात ठेवा. यासाठी क्रिएटर्सचे अकाउंट व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या जाहिराती या फक्त व्हेरिफाइट यूजर्संसाठी असतील” असे एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. ट्विटरच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो यांनी पदभार स्विकारल्यानंतर कंपनीने काही दिवसांनी सबस्क्रिप्शन प्रमोट करण्यासाठी आणि जाहिरातदारांना टिकवून ठेवण्यासाठी ठराविक गोष्टींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.