Technology Weekly Updates: टेक्नॉलॉजी क्षेत्र हे खूप विस्तारलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आणि प्रगती होत आहे. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक क्षेत्रामध्ये कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आयफोन १५ सिरीज लॉन्च, Whatsapp चे नवीन फीचर्स आणि एका कंपनीत झालेली कर्मचारी कपात अशा अनेक कितीतरी महत्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याभरामध्ये घडल्या आहेत. महत्वाच्या घडामोडींबद्दल माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयफोन १५ सिरीज लॉन्च

Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. १५ सप्टेंबरपासून आयफोन १५ सीरिजचे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. २२ सप्टेंबरपासून याची विक्री सुरु होईल. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५,आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स अशा चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये पहिल्यांदाच यूएसबी टाइप-सी पोर्ट चे फिचर देण्यात आले आहे. तसेच ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा देखील खरेदीदारांना यामध्ये मिळणार आहे.

हेही वाचा : भारतात iPhone 15 Series च्या प्री बुकिंगला सुरुवात; ‘या’ मॉडेल्सवर मिळतोय ५ हजारांचा कॅशबॅक, ऑफर्स एकदा पाहाच

WhatsApp चे नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. आतासुद्धा कंपनी ‘ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड व्हेरिफिकेशन’ (automatic security code verification)हे फिचर घेऊन आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे अँड्रॉइडवरील मर्यादित संख्येसाठी बीटा टेस्टर्ससाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसाठी ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड व्हेरिफिकेशन फिचर घेऊन आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचर्स आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo नुसार, या फीचरच्या मदतीने App कोणत्याही वापरकर्त्याच्या हस्तक्षेपाशिवाय मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहेत की नाही हे ऑटोमेटिकपणे व्हेरिफाय करण्याचा प्रयत्न करेल.

आयफोन १५ मध्ये असणार ISRO चे जीपीएस

Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे.  या इव्हेंटदरम्यान आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स हँडसेट भारताच्या GPS च्या NavIC (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन) ला सपोर्ट करतील असे कंपनीने सांगितले. Apple कंपनीने त्यांच्या कोणत्याही आयफोन मॉडेलला NavIC सपोर्ट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस हे मॉडेल्स NavIC ला सपोर्ट करत नाहीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारा संचालित NavIC हे आयफोन १५ मध्ये Galileo आणि GLONASS च्या इतर GPS सिस्टीमसह हँडसेटमध्ये उपलब्ध असणार आहे.

आयफोन १५ सीरिजचे बुकिंग सुरु

नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन १५ सिरीजमधील सर्व मॉडेल्सचे बुकिंग १५ सप्टेंबरपासून संध्याकाळी ५.३० वाजता सुरु झाले आहे. इच्छुक खरेदीदार त्यांच्या आवडीचे मॉडेल हे अधिकृत apple च्या वेबसाइट किंवा अधिकृत स्टोअरमधून मिनिमम टोकन रक्कम भरून बुकिंग करू शकणार आहेत. आयफोन १५ सिरीजची डिलिव्हरी भारतात २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

हेही वाचा : आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…

२०० मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन झाला लॉन्च

Honor कंपनीने भारतात आपला Honor 90 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Honor च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे. honor च्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. तसेच honor ९० ५जी स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच अल्ट्रा वाइड अँगलसह १२ मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे. भारतात Honor 90 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये आहे. तर १२/५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोनआजपासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर हा फोन उपलब्ध असेल. 

Google मध्ये कर्मचारी कपात

गुगलची मूळ कंपनी असलेल्या Alphabet ने आपल्या जागतिक रिक्रूटमेंट टीममधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कारण टेक कंपनीने कमर्चारी नियुक्त करणे देखील कमी केले आहे.गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने ग्लोबल रिक्रूटमेंट टीममधील जवळपास १०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीने घेतलेला निर्णय हा जागतिक स्तरावरील टाळेबंदीचा भाग नाही आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये अन्य ठिकाणी भूमिका शोधण्यासाठी मदत होणार आहे. अल्फाबेट कंपनी ही कमर्चाऱ्यांची कपात करणारी या तिमाहीमधील पहिलीच ‘बिग टेक’ कंपनी ठरली आहे. मेटा,मायक्रोसॉफ्ट आणि Amazon सारख्या कंपन्यांनी २०२३ च्या सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weekly tech updates iphone 15 series whatsapp feature google layoffs check all updates tmb 01