टेक्नॉलॉजी क्षेत्र हे खूप विस्तारलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आणि प्रगती होत आहे. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक क्षेत्रामध्ये कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये Airtel, Vi आणि Jio ने लॉन्च केलेले रिचार्ज प्लॅन्स, काही कंपन्यांमध्ये झालेली कर्मचारी कपात आणि WhatsApp मध्ये आलेले काही नवीन अपडेट्स, लॉन्च झालेले स्मार्टफोन असतील अशा अनेक घडामोडी मागच्या आठवड्यामध्ये घडल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Airtel ने ५६ व ८४ दिवसांसाठी लॉन्च केले रिचार्ज प्लॅन्स

एअरटेल आपल्या ग्राहकांच्या वाढत्या डेटाची मागणी पूर्ण करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यात आघाडीवर आहे. एअरटेल कंपनीने सध्या ५६ आणि ८४ दिवसांच्या वैधतेचे दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत.  ५४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, व्हॉइस आणि एसएमएस यामध्ये काही फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या ८३९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये २ जीबी दररोजचा डेटा मिळणार आहे. यामुळे वापरकर्ते जास्तीत जास्त इंटरनेटचा फायदा घेऊ शकतील. तसेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. त्यामुळे वापरकर्ते एखाद्याशी कितीही वेळ संवाद साधू शकणार आहेत. तसेच दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळणार आहे.

amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
7 floor metro station in pune
Video : पुण्यातील हे सात मजली मेट्रो स्टेशन पाहिले का? लोकप्रिय मेट्रो स्टेशनचा व्हिडीओ एकदा पाहाच
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News : वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!
Satya Nadella Praised Sharad Pawar for Agricultural Development Trust Baramati
Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
Lakshami Niwas
Video: लक्ष्मी सिद्धूला घरी बोलवणार, त्याची व भावनाची भेट होणार का? पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “सूर्याच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांना…”, तुळजाच्या हाती लागणार शत्रूविरूद्ध पुरावा; ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये ट्विस्ट

हेही वाचा : Airtel ने ५६ व ८४ दिवसांसाठी लॉन्च केले ‘हे’ रिचार्ज प्लॅन, दररोज २ जीबी डेटा आणि…

एकाच डिव्हाईसवर वापरता येणार अनेक अकाउंट

WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. तासुद्धा कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर घेऊन आली आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना WhatsApp वर एकाच डिव्हाईसवर अनेक अकाउंट वापरता येणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच मोबाईलवर अनेक अकाउंट वापरू शकणार आहात. त्याच्याआधी कंपनीने एकच अकाउंट दोन डिव्हाईसवर वापरता येईल असे फिचर आणले होते.

बायजूमध्ये पुन्हा नोकर कपात

शिक्षण आणि तंत्रज्ञान कंपनी बायजूने आपल्या पुनर्रचना प्रक्रियेचा भाग म्हणून विविध विभागांमधील सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. नोकर कपात केलेले कर्मचारी वेगवेगळ्या विभागातील आहेत. बायजूने सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. नवीन कर्मचार्‍यांच्या समावेशासह कंपनीची एकूण कर्मचारी संख्या ५०००० च्या आसपास आहे. नवीन नोकरकपात कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे दोन टक्के आहे. एक अब्ज डॉलर्सच्या कर्जफेडीवरून अमेरिकेच्या न्यायालयात कायदेशीर वाद सुरू असताना कंपनीतील टाळेबंदीला सुरुवात झाली आहे.

स्मार्ट टीव्हीसाठी Twitter लवकरच आणणार जबरदस्त अ‍ॅप

Elon Musk हे ट्विटर सीईओ आहेत. ट्विटर हे एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. ट्विटरवर मस्क हे सतत काही ना काही अपडेट वापरकर्त्यांसाठी घेऊन येत असतात. आतासुद्धा कंपनी स्मार्ट टीव्हीसाठी Video App वर काम करत असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना त्यांच्या टीव्हीवर ट्विटर व्हिडीओ पाहण्याची परवानगी देणार आहे. तसेच लोकांना नवीन व्हिडीओ शोधणे देखील सोपे होणार आहे. एलॉन मस्क यांनी १८ जून २०२३ रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की App ”येत” आहे. हे टीव्हीवर उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा : स्मार्ट टीव्हीसाठी Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त अ‍ॅप; एलॉन मस्क यांनी केली घोषणा

Chingari अ‍ॅपने केली कर्मचारी कपात

भारतीय शॉर्ट व्हिडीओ App असणाऱ्या Chingari या अ‍ॅपने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. हे अ‍ॅप इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारखे आहे. जून २०२० मध्ये टिकटॉकवर बंदी घातल्यावर चिंगारी अ‍ॅपला भारतीय बाजारपेठेमध्ये लोकप्रियता मिळाली.जगभरामध्ये आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Amazon , Google, Meta , Microsoft यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी तर दोनवेळा कर्मचारी कपात केली आहे.

Uber ने कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी

उबर कंपनी आपल्या Recruiting टीममधील २०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. वर्षभरामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या समान राहण्यासाठी कंपनीने कपातीचे पाऊल उचलले आहे. तसेच या वर्षाच्या सुरूवातीला देखील कंपनीने आपल्या माल वाहतूक सेवा विभागातील १५० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. उबर कंपनीमध्ये सध्या ३२,७०० कर्मचारी कार्यरत आहेत. आता करण्यात आलेली कर्मचारी कपात ही जागतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. Wall Street Journal च्या म्हणण्यानुसार, उबरने केलेली कपात Recruiting टीमच्या एकूण ३५ टक्के इतकी आहे. 

Intel इंडियाच्या प्रमुख निवृत्ती राय यांचा २९ वर्षांनी राजीनामा

Intel ही एक अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनी आहे. कॉम्पुटरचे सेइमीकंडक्टर चिप तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी ही एक मोठी कंपनी आहे. इंटेल कंपनीच्या भारतातील म्हणजेच इंटेल इंडियाच्या प्रमुख निवृत्ती राय यांनी तब्बल २९ वर्षांच्या आपल्या प्रभावी कार्यकाळानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवृत्ती राय यांनी राजीनामा दिल्याचे इंटेलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.निवृत्ती राय यांनी फेब्रुवारी १९९४ मध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून इंटेल कंपनीमध्ये आपल्या कामाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी इंटेल इंडियाचे हेड आणि आणि इंटेल फाउंड्री सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष या पदांवर काम केले.

हेही वाचा : Intel इंडियाच्या प्रमुख निवृत्ती राय यांचा २९ वर्षांनी राजीनामा, कसा राहिला कंपनीमधला प्रवास?

Google भारतातील गुजरातमध्ये उभारणार ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यावेळी सर्वात मोठे सर्च इंजिन असणाऱ्या गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी कंपनी गुजरात राज्यामध्ये त्यांचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडणार असल्याची घोषणा केली. तसेच भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये तब्बल १० अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक देखील करणार आहे.

Story img Loader