टेक्नॉलॉजी क्षेत्र हे खूप विस्तारलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आणि प्रगती होत आहे. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक क्षेत्रामध्ये कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये Amazon चा सेल, काही कंपन्यांनी केलेली कमर्चारी कपात, व्हॉट्सअॅपने लॉन्च केलेले फीचर्स, युट्युब कंटेंटस क्रिएटर्ससाठी झालेला निर्णय अशा अनेक कितीतरी महत्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्याभरामध्ये घडल्या आहेत. महत्वाच्या घडामोडींबद्दल माहिती जाणून घेऊयात.
WhatsApp लवकरच लॉन्च करणार Message Pin Duration फीचर
सध्या व्हॉट्सअॅप Pinning Message या फीचरवर काम करत आहे. WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप ‘message pin duration’ या फीचरवर काम करत आहे. हे आगामी फिचर वापरकर्त्यांना चॅट्स आणि ग्रुप्समध्ये मेसेज पिन केले जाऊ शकतात. व्हॉट्सअॅपच्या आगामी काळामध्ये येणाऱ्या अपडेटमध्ये ते रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. या फीचरवर सध्या काम सुरू आहे आणि WaBetaInfo द्वारे अँड्रॉइड 2.23.13.11अपडेटसाठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये ओळखले गेले आहे. जे गुगल प्ले स्टोअरवर असू शकते.
Google Mapsचे ‘स्पीड लिमिट ’ फिचर Over Speeding टाळण्यास करणार मदत
गुगल मॅप्सचे हे स्पीडोमीटर फिचर युजर्सला ते जात असलेल्या रस्त्यावर स्पीड लिमिटबाबत अलर्ट पाठवते. पण गुगल मॅप्स सांगते की, स्पीडोमीटर हे केवळ माहितीसाठी आहे. यूजर्सने केवळ त्यावर अवलंबून राहू नये तर स्वत: आपल्या वाहनाचा स्पीडोमीटर चेक करत राहावे.
गुगल मॅप्सवर स्पीड लिमिट फिचर कसे सुरू करावे
- गुगर मॅप्स सुरू करा
- वरच्या उजव्या कोपऱ्यात, प्रोफाइल पिचरवर टॅप करा.
- आता ‘सेटिंग्ज’ वर जा.
- आता ‘नेव्हिगेशन सेटिंग’ वर टॅप करा.
- जोपर्यंत तुम्हाला ‘स्पीड लिमिट्स’ पर्याय दिसत नाही तोपर्यंत खाली स्क्रोल करत रहा.
- आता ते चालू करण्यासाठी या पर्यायासमोरील टॉगल बटणावर टॅप करा.
you tube वरील कंटेंट डब करता येणार
You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. युट्युब सध्या एका नवीन टूल ची चाचणी करत आहे. जे क्रिएटर्सना AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून आपले व्हिडीओ ऑटोमॅटिक डब करण्यास मदत करेल. कंपनीने गुरूवारी VidCon येथे याबद्दलची घोषणा केली. युट्युबने AI संचालित डबिंग सेवा Aloud बरोबर एकत्रितपणे काम केले जे Google च्या इन-हाऊस इनक्यूबेटर एरिया १२० चा भाग आहे.या वर्षाच्या सुरुवातीला युट्युबने अनेक भाषांमध्ये ऑडिओ ट्रॅकला समर्थन केले होते. जे क्रिएटर्सना त्यांच्या नवीन आणि आधीपासून असलेल्या व्हिडिओमध्ये डबिंग जोडण्याची परवानगी देते. ज्यमुळे क्रिएटर्सना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. जून २०२३ पर्यंत क्रिएटर्सनी ७० पेक्षा जास्त भाषांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त व्हिडीओ डब केले आहेत.
‘ही’ कंपनी ChatGPT चा वापर करून प्रवास अन् निवास पर्यायांची योजना आखणार
लोकप्रिय ट्रॅव्हल बुकिंग कंपनी Booking.com आता त्यांच्या ट्रॅव्हल बुकिंग App मध्ये एक नवीन ‘ट्रिप प्लॅनर’ फिचर लॉन्च करणार आहे. असे कंपनीने मंगळवारी जाहीर केले. हे नवीन फिचर ChatGpt च्या प्रगत भाषांद्वारे समर्थित या हे नवीन फिचर नवीन फीचरचे उद्दिष्ट हे निवडक वापरकर्त्यांना प्रश्न विचारण्याची आणि वैयक्तिक प्रवासाचे नियोजन करण्यासाठी मदत करून ग्राहकांचा प्रवासाचा अनुभव वाढवण्याचा आहे. वापरकर्ते ट्रिप प्लॅनर या फीचरचा वापर करू शकतील. जे जाण्याचे ठिकाणी आणि तिथे राहण्याची व्यवस्था प्रदान करण्यासाठी Booking.com चे सध्याचे मशीन लर्निंग मॉडेलसह चॅटजीपीटीच्या क्षमतांना एकत्रित करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मधील सुविधांचा फायदा घेऊन बुकिंग डॉट कॉम आपल्या ग्राहकांना अधिक चांगला प्रवासाचा पर्याय शोधण्यासाठी मदत करणार आहे.
Paytm च्या pin recent payments फीचरमुळे पेमेंट करणे होणार जलद
One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे असणाऱ्या Paytm ने अॅपवर ‘pin recent payments’ या फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना पेमेंट करणे अधिक सोपे व्हावे असा कंपनीचा उद्देश आहे. पेटीएमने आणलेल्या या फीचरच्या मदतीने वापरकर्ते ५ महत्वाचे पेमेंट्स टॉपमध्ये पिन करू शकणार आहेत. म्हणजेच ज्यांना तुम्हाला दररोज किंवा सारखे व पेमेंट करावे लागते असे पेमेंट्स तुम्ही टॉपमध्ये पिन करू शकता. पिन केल्यामुळे तुम्हाला हे पाच पेमेंट्स कायम वरतीच दिसतील. त्यामुळे upi ने पैसे पाठवणे अधिक वेगवान होणार आहे.
Twitter वर युजर्सना मनमोकळेपणाने लिहिता येणार
Twitter हा एक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. एलॉन मास्क हे ट्विटरचे सीईओ आहेत. एलॉन मस्क सीईओ झाल्यापासून त्यांनी कंपनीमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. कंपनीने ब्लू सबस्क्रायबर्ससाठी ट्विट लिहिण्यासाठी असलेल्या शब्दमर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर आधी वर्षाच्या सुरुवातीला ट्विट लिहिण्याची शब्दमर्यादा ४ हजार इतकी होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करून १० हजार इतकी करण्यात आली होती. आता नवीन निर्णयानुसार ही वाढ २५ हजार इतकी करण्यात आलेली आहे. ट्वीटरने ब्लू सबस्क्रायबर्ससाठी शब्दमर्यादा वाढवण्याची तिसरी वेळ आहे. याबद्दल ट्वीटरच्या इंजिनिअर प्राची पोद्दार यांनी ट्विट करून ही बातमी दिली आहे.
ChatGPT आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं हिंदीत देणार
ChatGPT मधील नवीन अपडेटमुळे भारतामध्ये राहणारे नागरिक त्याना सोयीस्कर असलेल्या भाषेमध्ये AI चॅटबॉट वापर करू शकणार आहेत. मात्र चॅटजीपीटीचा वापर हिंदी किंवा तुम्हाला सोयीस्कर असलेल्या भाषेमध्ये कसा करायचा? त्याआधी हे लक्षात घेणे आवश्यक आहे ChatGpt सध्या काहीचं भारतीय भाषांमध्ये सपोर्ट करतो. आता ChatGPT वापरून हिंदीमध्ये प्रतिसाद कसा मिळवायचा ते जाणून घेऊयात.
‘ही’ प्रसिद्ध चिनी कंपनी भारतामध्ये करणार ५०० कर्मचाऱ्यांची कपात
Xiaomi India एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन गॅजेट्स लॉन्च करत असते. शाओमी इंडिया कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शाओमी इंडिया काही कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारांनी कमी करण्याचा विचार करत आहे. द इकॉनॉमिक टाईम्सनुसार, गेल्या दोन आर्थिक तिमाहींमध्ये भारतातील मोबाइल मार्केट शेअरमध्ये घसरण झाल्यानंतर कंपनी टीमची पुनर्रचना करण्याचा विचार करत आहे.
भारतीय डेव्हलपर्ससाठी गूगलने केली AI टूल्सची घोषणा
Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगलवर आपल्या एखाद्या विषयाशी संबंधित कोणतीही माहिती शोधू शकतो. ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केल्यानंतर गुगलने देखील आपले ‘Bard’ लॉन्च केले आहे. आता गुगलने बुधवारी भारतातील डेव्हलपर्सना सक्षम करण्यासाठी अनेक AI टूल्सची घोषणा केली आहे. कंपनीने बंगळुरू येथे देशातील पहिली I/O Connect डेव्हलपर्स कॉन्फरन्स आयोजित केली होती.
तसेच कंपनीने गुगल मॅप्स प्लॅटफॉर्ममध्ये Address Descriptors नावाच्या नवीन फीचरची घोषणा केली आहे. कंपनीचे हे फिचर देशातील २५ पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. वापरकर्त्यांना एखाद्या ठिकाणाचे नाव वापरून पत्ता शोधण्यासाठी हे फिचर मदत करेल अशा प्रकारे याचे डिझाईन करण्यात आले आहे.