गुगल हे असे एक व्यासपीठ आहे, जो प्रत्येकजण वापरतो आणि जिथे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सर्व समस्यांचे निराकरण मिळते. तसे, तुम्ही तुमची सर्च हिस्ट्री सहजपणे हटवू शकता. परंतु असे असूनही, भरपूर डेटा जतन होत राहतो जो सर्व सर्वेक्षणे आणि अहवालांसाठी वापरला जातो. सध्या एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये हे कळले आहे की गुगलवर मुलांनी आणि पुरुषांनी कशाबद्दल सर्वाधिक सर्च केले आहे.
‘फ्रॉम-मार्स डॉट कॉम’च्या रिपोर्टनुसार, पुरुष गुगलवर त्यांच्या लैंगिकतेबद्दल सर्वात जास्त सर्च करतात. अहवालानुसार, दरवर्षी सुमारे ६८ हजार पुरुष शोध घेतात की ते नपुंसक आहेत की नाही. यासोबतच मुलं गुगलला हेही विचारतात की दाढी केल्याने दाढीचे केस जास्त वाढतात की नाही आणि दाढी दाट करण्यासाठी कोणते उपाय आहेत.
काही सेकंदात हॅक करता येतात ‘हे’ ५० पासवर्ड्स; यात तुमचा तर नाही ना? पाहा संपूर्ण लिस्ट
पुरुषांना हे देखील जाणून घ्यायचे असते की पोनीटेल बनवल्याने किंवा टोपी घातल्याने केसांवर काय परिणाम होतो. वर्कआउट रूटीन, बॉडी-बिल्डिंग कसे करावे आणि कोणते प्रोटीन शेक प्यावे, या सर्वांचाही मुलांच्या गुगल सर्चमध्ये समावेश आहे.
या अहवालात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अहवालानुसार, पुरुषांच्या टॉप गुगल सर्चमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचाही समावेश आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग सामान्य आहे, परंतु मुलांना हे जाणून घ्यायचे असते की मुलांनाही स्तनाचा कर्करोग होतो की नाही; आणि तसे असल्यास, हे कसे घडते आणि याची टक्केवारी किती आहे.
Tech Trick : Google Chrome वर सेव्ह केलेले पासवर्ड डिलीट कसे करायचे? जाणून घ्या
मुलांना गुगलवर मुलींबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. या अहवालानुसार, मुले गुगलवर सर्च करतात की, मुलींना कसे प्रभावित केले जाऊ शकते, त्यांना खुश कसे करावे, त्यांना काय आवडते आणि काय आवडत नाही.